भोपाळ, 07 ऑक्टोबर : वाघासारख्या प्राण्यांना पाहण्याची इच्छा कुणाला नसते. यासाठी आपण प्राणीसंग्रहायल, नॅशनल पार्क किंवा जंगल सफारीवर जातो. अचानक वाघ समोर आला की काळजात धस्सं होतं. दरदरून घाम फुटतो. वाघाला कितीही पाहावंसं वाटलं तरी तो दिसल्यानंतर त्याच्यासमोर जाण्याची हिंमत होणार नाही. पण त्याला कॅमेऱ्यात टिपण्याचा मोहही आवरणार नाही. अशाच एका वाघाला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करता करता काही तरुणांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. रस्त्यावर वाघाला पाहून तरुणांना इतका उत्साह चढला की ते आपला मोबाईल घेऊन गाडीतून उतरले आणि वाघाच्या जवळ गेले. त्याचा व्हिडीओ काढता काढता त्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची डेअरिंग केली. पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे. हे वाचा - साधा साप समजून मुलाने खतरनाक King Cobra चीच शेपटी धरली; पुढच्याच क्षणी… Shocking Video व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक वाघ जंगलात दिसतो आहे. मध्ये रस्ता आहे आणि दोन्ही बाजूने झाडं आहे. रस्त्यावर काही मुलं उभी आहेत. जसे ते वाघाला पाहतात तसे इतके उत्साही होतात की ते वाघाला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करू लागतात. वाघाच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. तिकडून वाघ जंगलातून बाहेर येत असतो आणि इथून मुलं त्या वाघाच्या जवळ जात असतात. मध्येच एक मुलगा वाघाकडे पाठ करून उभा राहतो आणि वाघासोबत आपला सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर वाघ रस्त्यावर येतो. तरी तरुण तिथून हटत नाहीत. ते आणखी पुढे जातात. आता या तरुणांचं काही खरं नाही असंच वाटतं. हे वाचा - कसं शक्य आहे? मगरीच्या जबड्यात जाऊनही तो जसाच्या तसा जिवंत बाहेर आला; Shocking Video पुढे तुम्ही पाहाल तर वाघ रस्त्यावर येतो, रस्ता ओलांडतो आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या जंगलात घुसतो. सुदैवाने वाघ शांत होता, तो चवताळला नाही म्हणून हे तरुण वाचले. पण जर वाघ भडकला असता तर या तरुणांचं काही खरं नव्हतं.
Remember that if you see a large carnivore, it wanted you to see it. It never wanted to be chased. The tiger can maul you to death feeling threatened. Please don’t resort to this wired behaviour. pic.twitter.com/e0ikR90aTB
— Susanta Nanda (@susantananda3) October 6, 2022
हा व्हिडीओ मध्य प्रदेशच्या पन्ना टाइगर रिझर्व्हमधील आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. असा आपला जीव धोक्यात टाकू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स संतप्त झाले आहे.