मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! छोट्याशा कोळीने 20 पट मोठ्या पक्ष्याची केली शिकार; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

OMG! छोट्याशा कोळीने 20 पट मोठ्या पक्ष्याची केली शिकार; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

कोळी आणि पक्ष्याचा व्हिडीओ.

कोळी आणि पक्ष्याचा व्हिडीओ.

एक छोटासा कोळी त्याच्यापेक्षा मोठ्या पक्ष्याची शिकार करताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 21 सप्टेंबर : आपल्या घरातील एखाद्या कोपऱ्यात कुठे ना कुठे कोळ्याचं जाळं म्हणजे कोळ्यांचं घर आणि त्यात कोळी दिसतोच. या कोळ्यापासून आपल्याला तसा थेट धोका नसतो, त्यामुळे त्याची फार भीतीही वाटत नाही. त्यामुळे कोळ्याचं जाळं दिसलं की आपण हातात झाडू घेतो आणि या झाडूंनी ते जाळं उद्ध्वस्त करून टाकतो. हे जाळं किती कमकुवत आहे, फक्त कोळ्याचंच वजन पेलू शकेल, असं आपल्याला तेव्हा वाटतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल याच कोळ्याच्या जाळ्यात चक्क एक मोठा पक्षी अडकला आहे. कोळ्याच्या जाळ्यात आणि पक्षी... हे शक्यच नाहीच... असंच तुम्ही म्हणाल. पण असाच शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका छोट्याशा कोळ्याच्या जाळ्यात पक्षी अडकला आणि त्या पक्ष्याची शिकार करण्याचा प्रयत्नही या कोळ्याने केला. व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हे वाचा - बापरे! पक्षी धडकताच आकाशातून घरांवर कोसळलं भलंमोठं विमान; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO आपण पाहत असलेल्या कोळ्याचा सामान्य आकार किती असतो? आपल्या बोटाच्या पुढील भागाइतका... फार फार एका बाटलीच्या झाकणाइतका मोठा कोळी आपण पाहिला असेल. पण याच आकाराचा कोळी त्याच्यापेक्षा 20 पट मोठ्या आकाराच्या पक्ष्याची शिकार करायला गेला. व्हिडीओत पाहू शकता कोळ्याच्या जाळ्यात एक पक्षी अडकला आहे आणि तो तिथून सुटण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी धडपड करतो आहे. या जाळ्यात असलेला कोळी हळूहळू त्या पक्ष्याच्या दिशेने खाली येतो. कोळी पक्ष्याची शिकार करायला त्याच्या जवळ येतो खरा पण तो आपल्यापेक्षा खूप मोठा असल्याने त्याची शिकार करणं शक्य नाही हे कदाचित त्याला समजतं म्हणून तो पुन्हा वर जातो.
View this post on Instagram

A post shared by Lee Durkee (@lee3durkee)

lee3durkee इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. हे वाचा - किंग कोब्राला Kiss, 15 फूट लांब सापाशी खेळू लागला तरुण आणि मग... पाहा VIDEO तसे तुम्ही प्राण्यांच्या शिकारीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. पण शिकारीचा असा व्हिडीओ कधीच पाहिला नसाल. भले कोळ्याला पक्ष्याची शिकार करणं शक्य झालं नाही. पण त्याने प्रयत्न केला. त्यामुळे व्हिडीओ पाहून नेटिझन्सही थक्क झाले आहेत.
First published:

Tags: Other animal, Viral, Viral videos

पुढील बातम्या