वॉशिंग्टन, 18 सप्टेंबर : आकाशात एक छोटाशा पक्षी आणि भलंमोठं विमान आमनेसामने आले तर… या दोघांची धडक झाली तर मुक्या जीवाला दुखापत होईलच. पण विमानाचं काय होऊ शकतं, याचा कधी विचार केला आहे का? आता विमान किती मोठं असतं. छोटासा पक्षी या विमानाला धडकला तर विमानाचं काय होणार आहे?, काहीच नाही. असंच तुम्हाला वाटत असेल. तर हा व्हिडीओ पाहा. एक छोटासा पक्षीही विमानाला धडकल्यास इतकी मोठी दुर्घटना होऊ शकते, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. अशाच दुर्घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अमेरिकेत एका विमानाला पक्षी आदळला, त्यानंतर विमान क्रॅश झालं. हे विमान रहिवाशी परिसरात कोसळलं. दुर्घटनेचा हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल, तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. व्हिडीओत पाहू शकता विमान आकाशात उडताना दिसतं आहे. दोन पायलट बसलेले आहे. अचानक समोरून एक पक्षी विमानाच्या दिशेने उडत येताना दिसतो. तो या विमानाच्या समोरील खिडकीच्या काचेला धडकतो. हे वाचा - VIDEO - 16 सेकंदात 2 वेळा समोर आला मृत्यू; या ‘सुरक्षाकवच’मुळे वाचला तरुण थोडा वेळ सर्वकाही सुरळीत असतं. पण काही वेळाने विमान हलताना दिसतं आणि भयंकर दुर्घटना घडते. ज्यावेळी पक्षी धडकला तेव्हा विमान लँड होत होतं. पक्ष्याच्या विमानाला टक्कर बसल्यानंतर ते विमानाच्या इंजिनमध्ये खेचलं गेलं. त्याचवेळी पायटलचं विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान रनवेऐवजी टेक्सासमधील घरांवर कोसळलं.
Terrifying footage has emerged of the moment a bird gets sucked into the engine of a US military jet, causing it to malfunction and crash into a Texas neighbourhood last year. #9News pic.twitter.com/jJMardDnw0
— 9News Australia (@9NewsAUS) September 18, 2022
माहितीनुसार अमेरिकेच्या नौसेनेचं हे विमान आहे. ट्रेनिंग दरम्यान ही दुर्घटना घडली. सप्टेंबर 2021 सालातील या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. @9NewsAUS ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - स्कूटीचं हँडल फिरवताच फणा काढून बाहेर आला King Cobra; 2 मिनिटातच…; थरकाप उडवणारा VIDEO सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. विमान जमिनीवर कोसळण्याआधी त्यातील पायलट विमानातून बाहेर पडले. तसंच विमान ज्या घरांवर कोसळलं त्या घरांचं नुकसान झालं पण कोणत्याही नागरिकाला काही झालं नाही.