Home /News /viral /

सुसाट कारनं दिली जोरदार धडक आणि ट्रॅक्टरचे झाले तुकडे; थोडक्यात वाचला चालक, पाहा खतरनाक अपघाताचा VIDEO

सुसाट कारनं दिली जोरदार धडक आणि ट्रॅक्टरचे झाले तुकडे; थोडक्यात वाचला चालक, पाहा खतरनाक अपघाताचा VIDEO

अपघातात ट्रॅक्टर चालक अगदी थोडक्यात बचावला आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणतो अगदी तसंच काहीसं या चालकाच्या बाबतीत घडलं.

    मुंबई, 17 ऑक्टोबर : आपल्याकडे रस्ते आणि त्यावरून चालवणाऱ्या गाड्यांची एक वेगळी गम्मत असते. शहरांमध्ये ट्रॅफिक आणि त्यातून होणारे अपघात तर कधी ट्रॅफिकचे नियम मोडताना झालेले अपघात कधी खड्ड्यांमुळे होणारे अपघात तर कधी चालकाच्या चुकीमुळे झालेले अपघात पण एक खतरनाक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चिंचोळ्या गल्लीतून मोठ्या कौशल्यानं ट्रॅक्टर अगदी हळूहळू बाहेर मुख्य रस्त्यावर आणणार तेवढ्या समोरून येणाऱ्या भरधाव कारनं या ट्रॅक्टरला धडक दिली आणि मोठा अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक अगदी थोडक्यात बचावला आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणतो अगदी तसंच काहीसं या चालकाच्या बाबतीत घडलं. हे वाचा-थेट JCB ला म्हणाला, 'मला पाठ खाजवून दे'; Viral Video पाहून हातच जोडाल या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की ट्रॅक्टर चालवणारा चालक या कारवाल्याला हाताने इशारा करत आहे. मात्र कारचालक काही ऐकायला तयार नाही. भरधाव सुसाट स्पीडमध्ये असलेल्या कारनं या ट्रॅक्टरला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरच्या पुढचा भाग पूर्ण पणे तुटला आणि वेगळा झाला आणि चालक मात्र अगदी थोडक्यात बचावला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 6 हजारहून अधिक लोकांनी पाहिला असून 184 लोकांनी रिट्वीट केला आहे. या व्हिडीओवर अनेक कॉमेडी कमेंट्सही करण्यात आल्या आहेत. तर काही युझर्स हा व्हिडीओ खरा वाटत नसल्याचंही म्हणत आहेत. संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Shocking viral video

    पुढील बातम्या