मराठी बातम्या /बातम्या /Viral /मंडपातून पळालेल्या COUPLE ने 'या' खतरनाक ठिकाणी घेतले सात फेरे; VIDEO VIRAL

मंडपातून पळालेल्या COUPLE ने 'या' खतरनाक ठिकाणी घेतले सात फेरे; VIDEO VIRAL

लग्नमंडपातून पळालेल्या एका नवदाम्पत्याने एका वेगळ्याच ठिकाणी लग्न केल्याची (Wedding ceremony) घटना घडली आहे. सोशल मिडीयावर VIRAL झालेल्या एका VIDEO पाहिलात का?

लग्नमंडपातून पळालेल्या एका नवदाम्पत्याने एका वेगळ्याच ठिकाणी लग्न केल्याची (Wedding ceremony) घटना घडली आहे. सोशल मिडीयावर VIRAL झालेल्या एका VIDEO पाहिलात का?

लग्नमंडपातून पळालेल्या एका नवदाम्पत्याने एका वेगळ्याच ठिकाणी लग्न केल्याची (Wedding ceremony) घटना घडली आहे. सोशल मिडीयावर VIRAL झालेल्या एका VIDEO पाहिलात का?

दिल्ली, 9 सप्टेंबर : जगभरातील लोक आपल्या लग्नाला (Special wedding plans) खास बनवण्यासाठी अनेक PLANS करत असतात. लग्नातील आलिशान सुखसोयी असेल किंवा डेस्टिनेशन वेडिंग अशा कित्येक चांगल्या पद्धती लोक वापरतात. नवीन दांपत्याची एन्ट्री तर भयानकच असते. परंतु आता चालू लग्नमंडपातून पळालेल्या एका नवदांपत्याने जबरदस्त आणि घातक ठिकाणी लग्न केल्याची (Wedding ceremony) घटना घडली आहे. बकलोल शेखर या इन्साग्रामच्या पेजवरून सोशल मिडीयावर VIRAL झालेल्या एका VIDEO तून ही सर्व माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

चालू लग्नमंडपातून पळालेल्या या होणाऱ्या नवदांपत्याने चक्क एका दरीत लग्न करण्यासाठी जागा निवडली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. VIRAL झालेल्या या व्हिडीओत दोघेही  कड्याच्या टोकावर उभं राहून एकमेकांचे होण्याच्या आणाभाका घेताना दिसत आहेत.

त्याचबरोबर त्यांनी काही मोजक्या पाहुण्यांना या लग्नासाठी बोलावले आहेत. ते खास पाहुणेही या VIDEO तून स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूचा परिसरही कमालीचा असल्याने त्यांच्यासाठी हा लग्नसोहळा खास ठरणार आहे. कड्याच्या टोकावर उभ्या राहिलेल्या या कपलचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर VIRAL झाल्यामुळे लोकांनीही याचा आनंद घेण्याची संधी मिळाली आहे.

VIDEO: नशेत मॉडेलचा धिंगाणा; सैन्याची जिप्सी अडवून जवानाला धक्काबुक्की

हा व्हिडीओ VIRAL झाल्यानंतर या व्हिडीओवर कमेट्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे. त्या व्हिडीओच्या खाली विनोदी पद्धतीने कमेंट करताना एका यूजरने लिहीलं आहे की 'हा लग्नसोहळा यादगार आहे. परंतु हा तिच्या नवऱ्याचा आनंदी असण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे फार आनंद घेऊ नका'. तर दुसऱ्या एका यूजरने त्या दोघांची खिल्ली उडवताना म्हटलं आहे की 'यांनी अशा ठिकाणी यामुळे लग्न केले आहे कारण त्यांचा खर्च वाचायला हवा', तर दुसऱ्या एका यूजरने या लग्नाला 'अतिशय सुंदर लग्नसोहळा' असं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking viral video, Viral video., Wedding couple