मुंबई, 21 एप्रिल: कोरियन व्यक्तींसारखा तुकतुकीत चेहरा आपल्याला मिळावा अशी जगातील अनेकांची इच्छा असते. कोरियन पुरूष, स्रिया सगळेच देखणे असतात. त्यामुळे सौंदर्यासाठी त्यांचं जगभर कौतुक होत असतं. हे जसं शारीरिक वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणेच प्रत्येक देशाचं एखादं पारंपरिक वैशिष्ट्यही असतं. दक्षिण कोरिया (South Korea) या देशातली माणसाचं वय मोजण्याची म्हणजे वयमापन पद्धती हे जगासाठी एक कोडं आहे. इथं दोन-तीन पद्धतीने माणसाचं वय मोजलं जातं. देशाची अशी अधिकृत वय मापन पद्धती सध्या तरी अस्तित्वात नाही. दक्षिण कोरियातील अजब वय मापन पद्धतीमध्ये (South Korean Weird Age System) एखादं मूल जन्मलं तर काही आठवड्यांनंतर त्याचं वय थेट दोन वर्षं गृहित धरलं जातं. भारतात जसं जन्मदिनापासून पुढे दिवस आणि वर्षं अशा पद्धतीने माणसाचं वजन मोजलं जातं तसं दक्षिण कोरियात काहीही नाही. तिथं वापरल्या जाणाऱ्या एका वयमापन पद्धतीनुसार कॅलेंडरमधलं (One Calendar year) वर्ष बदललं की ती व्यक्ती एक वर्षाने मोठी होते. एन्ट्रीच्यावेळी नवरा मुलगा मित्रांसोबत बिझी, वधूला आला राग; मग काय झालं ते बघाच
जन्मत: च मूल होतं एक वर्षाचं
दक्षिण कोरियात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेली एकही वयमापन पद्धती अस्तित्वात नाही. त्यामुळे एका पद्धतीनुसार बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते बाळ एक वर्षाचं आहे असं गृहित धरलं जातं. या पद्धतीनुसार जर एखादं बाळ डिसेंबर महिन्यात जन्माला आलं तर त्याचं जन्मत: वय एक वर्ष असतं (One year old baby) आणि वर्ष बदललं की 1 जानेवारीपासून (First January) ते बाळ दोन वर्षांचं झालं असं तिथले नागरिक मानतात. तसंच एका दिवसाच्या बाळाचं वयही एक वर्ष मानलं जातं हेच या वयमापन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. लय भारी! चिमुकल्याचा जबरदस्त VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही नाचल्याशिवाय राहणार नाही
आता बदलेल पद्धत
दक्षिण कोरियातील दुसऱ्या वयमापन पद्धतीनुसार जन्मलेल्या बाळाचं वय 0 वर्ष मानलं जातं आणि दरवर्षी 1 जानेवारीला त्याचं वय एक वर्षानी वाढतं. या पद्धतीत बाळ कुठल्या दिवशी जन्मलं याच्याशी वयमापनाचा काहीही संबंध नसतो. त्यामुळेच अद्याप दक्षिण कोरियात वयमापनाची एक अशी अधिकृत पद्धतच अस्तित्वात नाही. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती सुक यिओल यांचं सरकार एक वयमापन पद्धती देशात लागू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जर ही पद्धत लागू झाली तर त्या दिवसापासून दक्षिण कोरियातील प्रत्येकाचं वय एक वर्षानी कमी होईल. बीबीसीच्या वृत्तानुसार यिओल यांचं मत आहे की विविध वयमापन पद्धतींचा वापर होत असल्याने समाजात संभ्रमावस्था निर्माण होते आणि त्याचा सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर परिणामही होतो.