मुंबई, 21 एप्रिल : तसं गाणं लागलं, बँडचा आवाज कानावर पडलं की काही नाही तर किमान पाय तरी थिरकतातच. काहींच्या तर अंगातच संचारतं. नीटनेटकं नाचता येत नसलं तरी नागिण डान्स, गणपती डान्स तर सर्वांनाच येतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे
(Child dance video).
चिमुकल्याने बसल्या बसल्याच जबरदस्त डान्स केला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरू शकणार नाही. आऊट ऑफ कंट्रोल होऊन तुम्हीही नाचू लागाल. या चिमुकल्यावरून तुमची नजर एका क्षणासाठीही हटणार नाही. पुन्हा पुन्हा पाहत राहावा असा हा व्हिडीओ आहे.
व्हिडीओत पाहू शकता काही लहान मुलं बसलेली दिसत आहे. एका ठिकाणी ते सर्वजण पाहत आहेत. बॅकग्राऊंडला 'राजा तू तू मना राजा रे'
(Raja Tu Tu Mana Raja Re song) हे गाणं ऐकू येतं आहे. एक निरागस चिमुकला ते नीट कान देऊन ऐकताना दिसतो. जसं गाणं वाजतं तसं त्याच्या अंगात संचारतं. गाणं-बँडच्या तालावर तोही ठेका धरतो.
हे वाचा - अरारारा खतरनाक! 'पापा की परी'चं थरारक करतब; VIDEO पाहून भल्याभल्यांची हवा टाइट
सुरुवातीला दोन्ही दातांनी आपल्या दोन्ही पायांवर मारतो. जणू काही त्याच्यासमोर बँडच आहे. त्यानंतर काय त्याची गाडी गाण्यावर सुसाट सुटते. दोन्ही हात वर करून एक बोट भिरकावत मान डोलावत तो नाचतो. त्याच्या आजूबाजूला असलेली मुलंही त्याच्याकडे पाहून हसतात. पण या मुलाला दुसरं कसलंच भान नाही. आपण कुठे आहोत, आपल्याकडे कोण बघतं आहे, आपल्याबाबत कोण काय बोलतं आहे, याची त्याला काहीच पडलेली नाही. तो आपल्याच धुंदीच नाचतो.
मराठी व्हारल न्यूज फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ आहे. याशिवाय बऱ्याच सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समजलेलं नाही. पण जळगाव जिल्ह्यातील अमरनेर तालुक्यातील असल्याचं सांगितलं जातं आहे.
हे वाचा - तूने मारी एंट्री और...! नवरीबाई येताच सर्वांना भरली धडकी; कधीच पाहिली नसेल इतकी जबरदस्त Bridal Entry
पण खरं सांगा या चिमुकल्याला पाहिल्यानंतर तुमचंही शरीर थिरकलं नाही. तुम्ही याला पाहून नक्कीच भन्नाट डान्स केला असेल हो की नाही? हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.