जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Wedding Video: नवरी मुलगी घेत होती एन्ट्री, नवरा मुलगा मित्रांसोबत बिझी; वधूला आला राग अन्...

Wedding Video: नवरी मुलगी घेत होती एन्ट्री, नवरा मुलगा मित्रांसोबत बिझी; वधूला आला राग अन्...

Wedding Video: नवरी मुलगी घेत होती एन्ट्री, नवरा मुलगा मित्रांसोबत बिझी; वधूला आला राग अन्...

Wedding Viral Video: नव्या नवरीसाठी (new bride) तिचा लग्नाचा दिवस (wedding day) खूप स्पेशल असतो. स्वतःची एन्ट्री स्पेशल करण्यासाठी वधू डान्स करता करता स्टेजवर एन्ट्री घेते. हे सर्व घडत असताना सर्वांच्या नजरा फक्त वधूवरच असतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 एप्रिल: नव्या नवरीसाठी (new bride) तिचा लग्नाचा दिवस (wedding day) खूप स्पेशल असतो. ती प्रत्येक मौल्यवान क्षणाची वाट पाहत असते. त्यातच ती तिच्या एन्ट्रीची खूप आतुरतेनं वाट पाहत असते, कारण तिची एन्ट्री खूप खास असते. स्वतःची एन्ट्री स्पेशल करण्यासाठी वधू डान्स करता करता स्टेजवर एन्ट्री घेते. हे सर्व घडत असताना सर्वांच्या नजरा फक्त वधूवरच असतात. बऱ्याचदा असं होतं की, वधूला इतके जण घेरतात की वरालाही ती दिसत नाही. असाच एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, जेव्हा वरानं (groom) वधूच्या एन्ट्रीकडे दुर्लक्ष केले आणि त्यानंतर तिची आलेली रिअॅक्शन खतरनाक होती. वधूच्या एन्ट्रीकडे वराचा दुर्लक्ष सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नववधू स्टेजवर येण्यासाठी तयार असताना तिला वराची नजर तिच्यावर असावी असे वाटतं होतं, पण तसं होत नाही. तो त्याच्या मित्रांशी बोलण्यात बिझी होता. यावर वधूला खूप राग येतो आणि एंट्री पॉईंटवरच वराला बोलावू लागते. अनेक वेळा ती त्याला हाक मारते पण तसं करूनही तो ऐकत नाही. तेव्हा वधूची प्रतिक्रिया आश्चर्यकारक असते. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच्या वरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा वर आपल्या मित्रांमध्ये व्यस्त असतो आणि वधूच्या एन्ट्रीकडे दुर्लक्ष करतो.’ गाणे वाजताच वधूनं केलं हे काम वधू वराकडे इशारा करते आणि बोट दाखवून म्हणते, ‘वराला इथे बघायला सांगा.’ सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. इन्स्टाग्रामवर wedabout नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला.

जाहिरात

हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा वधूला तिच्या वधूच्या एन्ट्रीदरम्यान सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळवण्याची इच्छा असते आणि आम्ही याबाबतीत तिच्यासोबत आहोत!’ इतर अनेक यूजर्संनी देखील या व्हिडिओवर (Instagram Reels Video) आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात