• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अरेच्चा! तोंडातली शिकार तिथंच सोडून बिबट्याने चक्क ठोकली धूम; नेमकं असं काय घडलं पाहा VIDEO

अरेच्चा! तोंडातली शिकार तिथंच सोडून बिबट्याने चक्क ठोकली धूम; नेमकं असं काय घडलं पाहा VIDEO

जिथं शिकार केली तिथंच ती सोडली आणि आधी बिबट्यानेच पळ काढला कारण...

 • Share this:
  मुंबई, 14 जुलै : सिंह असो, वाघ असो किंवा बिबट्या (Leopard). या हिंस्र जंगली प्राण्यांच्या तावडीत एकदा का कुणी सापडलं तर त्याची सुटका नाहीच. त्याचा फडशा या प्राण्यांनी पाडलाच समजा. पण सध्या सोशल मीडियावर (Social media viral video) अशा बिबट्याचा (Bibtya) व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्याने चक्क तोंडात आलेली शिकारच (Leopard running away after hunting) सोडली आहे. इतकंच नव्हे तर तिथून धूमसुद्धा ठोकली आहे. शिकार सोडून धूम ठोकणाऱ्या बिबट्याने सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. हा बिबट्या चर्चेत आहे. कारण शिकार न मिळणं ठिक पण शिकार मिळाली ती अगदी तोंडात आहे. पण ती असं कसं कुणी का सोडून देईल बरं. यासाठी हा व्हिडीओ पाहा. मग त्यामागील नेमकं कारण तुम्हाला समजेल. व्हिडीओत पाहू शकता. एक ससा (Rabbit) पळतो आहे आणि त्याच्या मागे बिबट्या. ससा पळण्यात जितका चपळ, तितकाच बिबट्याचाही पळण्याचा वेग काही कमी नाही. एका ठिकाणी बिबट्या सशाला गाठतोच. सशाची मान तो आपल्या तोंडात धरतो (Leopard hunting rabbit) आणि तिथून पळ काढणारच असतो. अरे हे काय? इतक्या मेहनतीने बिबट्याने केलेली शिकार त्याने पुन्हा सोडली. म्हणजे तोंडात धरलेल्या सशाला त्याने जमिनीवर पुन्हा टाकलं आणि चक्क पळ काढतो आहे. हे वाचा - बापरे बाप! धावत्या कारच्या काचेवर आला साप, 2 तास तसाच केला प्रवास, VIDEO व्हिडीओत पुढे पाहाल तर बिबट्या शिकार सोडून पळ काढतो याला कारण म्हणजे रानडुक्कर (Wild Pig). जसा बिबट्याने सशाचा पाठलाग केला. तसा या डुकराने बिबट्याचा पाठलाग केला. डुक्कर इतका अवाढव्य आहे की त्याला पाहून बिबट्याही घाबरतो. आता तरी त्याला आपल्या पोटाच्या भुकेपेक्षा जीव अधिक महत्त्वाचा वाटला. त्यामुळे त्याने आपली शिकार त्याने तिथंच सोडली आणि डुकरापासून जीव वाचवण्यासाठी तो पळत सुटला. त्याने तिथूनच धूम ठोकली. हे वाचा - वासरापेक्षाही ठेंगणी, दीड फुटांची राणी; चर्चेत आहे ही सर्वात लहान गाय डुकरानेही बिबट्याचा पिच्छा काही सोडला नाही. त्याने बिबट्याचा पाठलाग केला. जणू हे डुकर बहुतेक सशाचा जीवच वाचवण्यासाठी आलं होतं. त्यामुळे बिबट्याने सशाला तोंडात धरताच ते वाऱ्यासारखं बिबट्याच्या दिशेनं आलं आणि त्याच्या मागे धावत सुटलं. ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जंगलाचा कायदा असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: