बापरे बाप! धावत्या कारच्या काचेवर आला साप, 2 तास तसाच केला प्रवास, VIDEO

बापरे बाप! धावत्या कारच्या काचेवर आला साप, 2 तास तसाच केला प्रवास, VIDEO

राष्ट्रीय महामार्ग असल्याने गाडी मध्येच थांबवणंही शक्य नव्हतं, त्यामुळे दोन तास प्रवास करत गाडी पोलिसांच्या चौकीजवळ...

  • Share this:

पुणे, 13 जुलै: पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर अनेक भागात सापांचं दर्शन होत असते. नदी नाल्यातून सापं मुक्तपणे मोकळा जागेत वावरताना दिसतात. कधी घरात तर कधी दुचाकीमध्ये साप शिरल्याची घटना घडली आहे. पण, कधी धावत्या कारच्या बोनेटवर साप (snake) आला असं ऐकलं का? नाही ना पण राष्ट्रीय महामार्गावर (Nashik Madhya Pradesh National highway) एक साप कारच्या बोनेटवर अवतरला आणि दोन तास तसाच प्रवास करावा लागल्याची थरारक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही थरकाप उडवणारी घटना मध्यप्रदेशहून नाशिककडे येणाऱ्या महामार्गावर घडली. 11 जुलै रोजी मध्य प्रदेशमधील अंजड येथील छोटू सिंग राजपूत यांना भेटून  रत्नदिप सिसोदिया आपल्या कुटुंबीयांसह परत येत असताना त्यांच्या शेतातील घराजवळ कसे साप येतात अशा गप्पा गाडीत सुरू असताना भाचा रितेशला गाडीच्या बोनेटवर एक साप आढळून आला.

साप चक्क गाडीच्या बोनेटवरच अवतरला होता. थोड्या वेळाने हा साप गाडीच्या समोरच्या काचेवर आला आणि खेळू लागला. हा प्रकार गाडी मध्ये बसलेल्या सर्व प्रवाश्यांच्या लक्षात आला आणि त्यांची पाचावर धारण बसली. महामार्ग असल्याने गाडी मध्येच थांबवणंही शक्य नव्हतं.

मोठी बातमी! भारतातील पहिला कोरोना रुग्ण पुन्हा व्हायरसच्या विळख्यात

अशा वेळी गाडी चालवत असलेल्या रत्नदीप सिसोदिया यांनी प्रसंगवधान दाखवलं आणि या सापासोबत तब्बल दोन तास प्रवास केला.  अशातच शिरपूर साखर कारखाना जवळील महामार्ग पोलिसांची चौकी गाठली. त्यानंतर सर्पमित्र प्रेम ब्रिहाडे यांना बोलावले. गाडीच्या मागच्या बाजूला सर्प गेल्याने दहिवद येथील हॉटेल पद्मावतच्या बाजूला सर्विस स्टेशनच्या रॅम्पवरगाडी चढून अथक प्रयत्नातून सापला अखेर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या सापाला जंगलात सोडून देण्यात आलं.

Published by: sachin Salve
First published: July 13, 2021, 4:02 PM IST
Tags: Snake

ताज्या बातम्या