मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - तुडवून, आपटून पाण्यातच मारून टाकलं; पिल्लांना वाचवण्यासाठी आईची मगरीशी थरारक झुंज

VIDEO - तुडवून, आपटून पाण्यातच मारून टाकलं; पिल्लांना वाचवण्यासाठी आईची मगरीशी थरारक झुंज

मगर पिल्लांवर हल्ला करायला येताच हत्तीणीने पाण्यात घुसूनच तिचा जीव घेतला (Elephant killed crocodile).

मगर पिल्लांवर हल्ला करायला येताच हत्तीणीने पाण्यात घुसूनच तिचा जीव घेतला (Elephant killed crocodile).

मगर पिल्लांवर हल्ला करायला येताच हत्तीणीने पाण्यात घुसूनच तिचा जीव घेतला (Elephant killed crocodile).

केपटाऊन, 20 ऑक्टोबर : पाण्यात मगरीचं (Crocodile) राज्य असतं, तिथं तिच्याशी वैर (Crocodile Video) घेणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाणं. पण याच मगरीपासून पिल्लांना वाचवण्यासाठी एका आईने तिला पाण्यातच मारून टाकलं आहे. हत्तीणीने (Elephant)  पाण्यातच मगरीशी झुंज दिली. पिल्लांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मगरीचा हत्तीणीने (Elephant video)  आपल्या पायाखाली तुडवून, सोंडेने आपटून जीव घेतला आहे (Elephant killed crocodile video).

पाणी पिण्यासाठी नदीवर आलेल्या हत्तीवर मगरीने हल्ला (Elephant and crocodile fight) करायला येताच इतका राग आला की हल्ला (Crocodile attack on elephant) करायला आलेल्या मगरीलाच (Elephant and crocodile) त्याने अद्दल घडवली. मगरीच्या शेपटीला धरून त्याने तिला पाण्यातच आपट आपटलं (Elephant attack on crocodile). हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

हत्ती मगरीवर पाय देताना दिसतो आहे. मध्येच तो सोंडेने तिला फिरवतो. त्यानंतर तिची शेपटी आपल्या तोंडात धरून तिला उलटंसुलटं करून पाण्यातच आपटतो. मगरीची अवस्था इतकी भयंकर झाली आहे की तिला हलताही येत नाही. हत्तीच्या तावडीतून सुटण्यासाठी ती धडपडत असते. पण तिची सुटका काही होत नाही. बिचारी पाण्यात तशीच पडून राहिते आणि अखेर तिचा मृत्यू होतो. मृत्यूनंतरच हत्तीच्या तावडीतून ही मगर सुटते.

हे वाचा - पाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO

भले मगरीचं पाण्यात राज्य असलं, अगदी एका फटक्या ती आपली शिकार धरत असली, पाण्यात ती कितीही ताकदवान असली तरी एका आईसमोर तिची ही ताकद फेल आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार ही घटना आफ्रिकेतील आहे. आफ्रिकन हत्तींचा कळप झाम्बेझी नदीवर पाणी प्यायला गेला होता. त्यावेळी मगरीने छोट्या हत्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हत्तीची आई संपत्त झाली आणि तिने मगरीचा पाण्यातच जीव घेतला.

हे वाचा - जबड्यात धरून खेचत पाण्याबाहेर आणलं; बिबट्यानं मगरीच्याच घरात केली तिची शिकार; पाहा VIDEO

हत्तीने मगरीवर केलेला हा हल्ला पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. व्हिडीओ पाहून डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे.

First published:
top videos

    Tags: Crocodile, Elephant, Viral, Viral videos, Wild animal