मुंबई, 16 जानेवारी : मगर (crocodile) शिकार करतानाचे तरे बरेच व्हिडीओ (video) आपण पाहिलं आहेत. नदी किंवा तलावाजवळ आपली तहानलेले प्राणी (animal) येताच मगर त्यांना आपली शिकार बनवून आपली भूक भागवते. मग तो प्राणी कितीही मोठा किंवा हिंसक का असेना? मगर काही अशा प्राण्यांना घाबरत नाही. अशाच एका मगरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे. ज्यामध्ये ती एका भलामोठ्या हत्तीवर (elephant) हल्ला करते.
मगर हत्तीची शिकार करते, त्यावेळी भलामोठा हत्ती काय करतो, याचा हा व्हिडीओ. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या ट्विटवर त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Crocodiles are known to attack & kill baby https://t.co/Qcr2Eb0mif it was a case of biting more than it can chew. But the bite can proves deadly for the adult ones many a times with the trunk getting heavily damaged.
व्हिडीओत पाहू शकता. जिथं हत्तीचं कुटुंब पाणी पिण्यासाठी आलं आहे. तीन हत्ती या व्हिडीओत दिसत आहेत. ज्यात एक मोठा हत्ती आणि इतर दोन लहान हत्ती दिसत आहेत. त्यापैकी एक हत्ती खूपच लहान आहे.
हत्ती सोंडेनं पाणी पित असतात, आपली तहान भागवत असतात. त्याचवेळी पाण्यात एक मगर दबा धरून बसलेली आहे. पाण्यात मगर आहे, याची कल्पनाही या हत्तींना नव्हती. ते शांतपणे पाणी पित होते. मगरीनं संधी साधून ज्या सोंडंनं हत्ती पाणी पित होता, त्याच सोंडेला तिनं आपल्या जबड्यात धरलं. इतर दोन हत्तीही त्यावेळी घाबरतात आणि पळून पाण्याच्या बाहेर जातात. तिथून थोडं दूर होतात.
तर ज्या हत्तीची सोंड मगरीनं धरली आहे, तो हत्ती मगरीचा प्रतिकार करतो, तिच्याशी लढतो. मगरीनं सोंड धरल्यानं हत्तीलाही वेदना होत होत्या. त्यामुळे मगरीच्या तोंडातून आपली सोंड बाहेर काढण्यासाठी तो ती जोरजोरात हलवायला सुरुवात करतो. वाकडीतिकडी करून तो सोंड हलवू लागतो आणि मगरीला पाण्यातच जोरजोरात आपटू लागतो. कपडे धुवावेत तसं या हत्तीनं त्या मगरीला धुतलं आहे. जोपर्यंत मगर सोंड सोडत नाही तोपर्यंत तो तिला आपटत राहतो.