Home /News /viral /

डुक्कराच्या पेंटिगमुळे मालकीण झाली श्रीमंत; हा अनोखी प्रकार वाचून थक्क व्हाल!

डुक्कराच्या पेंटिगमुळे मालकीण झाली श्रीमंत; हा अनोखी प्रकार वाचून थक्क व्हाल!

तुम्ही मोठमोठ्या कलाकारांची चित्र पाहिली असतील? प्राण्यानं काढलेलं चित्र कधी पाहिलं आहे?

    केपटाऊन, 21 मार्च : या इतक्या मोठ्या चित्रविचित्र गोष्टींनी भरलेल्या जगात कधी काय होईल सांगता येत नाही. एका खास चित्राबाबत जाणून घेतल्यावर तुम्ही एकदम थक्क होत चक्रावून जाल. या चित्राची विक्री झाली तब्बल 2.36 लाख रुपयांमध्ये. तुम्ही विचार करत असाल, की ही एखाद्या व्यक्तीनं बनवलेली पेंटिंग असेल. पण नाही. ही चक्क एका डुकरानं बनवलेली पेंटिंग आहे. हो तुम्ही बरोबर वाचलं, एका डुकरानं. या डुकराचं नाव आहे पिग्कासो. (pig painter from south Africa news) हा पिग्कासो गेली अनेक वर्ष चित्रं काढतो आहे. नुकतंच त्यानं ब्रिटनच्या प्रिन्स हॅरी याचंही चित्र बनवलं. याची खरेदी स्पेनच्या एका व्यक्तीनं 2.36 लाख रुपयांना केली. पिग्कासोनं आजवर आपल्या पेंटिंग्जच्या माध्यमातून 50 लाख 23 हजार रुपये कमावले आहेत. हे सगळे पैसे इतर प्राण्यांच्या देखभालीवर खर्च केले गेले. (pigcaso painting news) हेही वाचा प्रसिद्ध शेफच्या मुलीनं प्रॅंकच्या नावावर केली विचित्र गोष्ट, व्हायरल झाला VIDEO पिग्कासोचं वय आहे 4 वर्ष. त्यानं आजवर शेकडो पेंटिंग्ज बनवल्या आहेत. पिग्कासोच्या मालकिणीचं नाव आहे जोने लेफसन. लेफसन आणि पिग्कासो साऊथ आफ्रिकेत राहतात. डुकराच्या या पेंटिंगच्या माध्यमातून जेवढं उत्पन्न होतं, ते लेफसान फार्ममधील जनावरांसाठी खर्च करतात. (pigcaso who painted prince harry) अडीच लाखात विकणारी ही पेंटिंग पिग्कासोनं अगदी काही मिनिटात तयार केली. लेफसन म्हणाली, की स्पेनमध्ये राहणाऱ्या पिग्कासोच्या एका फॅननं या चित्रासाठी इतकी मोठी रक्कम दिली. (pigcaso whose paintings get sold in lakhs) हेही वाचा पहिल्यांदाच डेटवर गेलेल्या तरुणीची झाली भलतीच फजिती, मजेशीर VIDEO VIRAL याआधी  पिग्कासोनं ब्रिटनच्या राणीच चित्रही बनवलं होतं. याची विक्री 2 लाख रुपयांना झाली होती. पिग्कासोला त्याची मालकीण कत्तलखान्यातून घेऊन आली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Painting, Spain

    पुढील बातम्या