नवी दिल्ली 20 मार्च : प्रेमात पडल्यानंतर अनेकांना डेटवर जायला खूप आवडतं. त्यातल्या त्यात पहिली डेट (First Date) म्हटलं की जास्तच उत्सुकता असते. आजकाल डेटचा ट्रेंड खूप वाढला आहे. पहिल्या डेटसाठी जोरदार तयारी केली जाते. हॉटेल्स, सीसीडी किंवा एखाद्या सुंदर ठिकाणावर तरुण-तरुणी जातात. पण या पहिल्या डेटवर गेले असता एखादी गोष्ट घडून त्या डेटची पूर्ण मजाच खराब झाली तर? असं होऊ नये असं अनेकांना वाटतं. पण अमेरिकेतल्या एका तरुणीच्या पहिल्या डेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालासुद्धा हसू आल्याशिवाय राहाणार नाही. अमेरिकेत राहणाऱ्या या तरुणीचे नाव एमिली टेडफोर्ड (Emily Tedford) असं आहे. एमिली पहिल्या डेटसाठी खूपच एक्साइटेड होती पण या संपूर्ण डेटची मजाच गेली. एमिलीने स्वत: सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपल्या पहिल्या डेटमध्ये नेमकं काय झालं हे सांगितलं आहे. व्हिडिओची सुरुवातीलाच एमिलीने तोंडावर हात ठेवला आहे. हे पाहून कोणलाही वाटेल की एमिलीसोबत काही तरी घडलं असावं किंवा तिच्या तोंडाला दुखापत झाली असावी. पण तसं काही झालं नाही. एमिलीने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की, ‘पहिल्या डेटसाठी मी खूपच एक्साइटेड होते. थोडीफार मजा-मस्ती करण्यासाठी मी थीम पार्कमध्ये गेले होते.’ पण कोरोनामुळे अजूनही त्याठिकाणी अनेक निर्बंध आहेत. नागरिकांना तोंडाला मास्क लावणं अनिर्वाय आहे. पण एमिलीला काय माहिती, की तोंडाला लावलेल्या मास्कमुळे तिची ही अवस्था होईल.
एमिलीनी सांगितलं की, ‘मी ओठांना लिपस्टिक लावली होती. पण तोंडाला मास्क लावल्यामुळे माझी लिपस्टिक ओठांच्या आजूबाजूला पसरली होती. माझा असा चेहरा पाहून इतर लोकं खूप हसत होते.’ एमिलीने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करताच तो व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर युजर्स जोरदार कमेंट्स करत आहेत. एमिलीच्या या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.