मुंबई २० नोव्हेंबर : सोशल मीडिया वर प्राण्यांशी संबंधीत अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असणार. यामध्ये कधी खूपच क्यूट तर कधी हिंसक आणि खतरनाक व्हिडीओ समोर येत असतात. त्यात सापाशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असणार. सध्या सपांशी संबंधीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही नक्की म्हणाल की आई ही आईच असते…. मग ती माणूस असू देत किंवा मग प्राणी-पक्षी. तुम्ही नेहमीच सापां हल्ला करताना पाहिले असेल. मात्र या व्हिडीओमध्ये सापाला घाम फुटला आहे. किंग कोब्रासारखा धोकादायक सापसोबत कोंबडीने जे केलं ते खरोखरंच धक्कादायक आहे. हे ही पाहा : Video : शेजारच्यांची भांडणं ऐकून कुत्र्याची वाढली क्युरॉसिटी, सरळ उठला आणि… आई नेहमीच आपल्या मुलांसाठी काहीही करण्याची तयारी देखवते. त्यामुळे आपल्या मुलांवर आलेले संकट आई नेहमीच स्वत:वर घेते. असंच काहीसं या कोंबडीनं देखील केलं आहे. तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ पाहा.
आपल्या मुलांना काहीतरी धोका आहे, लक्षात येताच कोंबडी सापाशी भिडते. आपल्या मुलांना वाचवण्यासाठी कोंबडी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सापाशी पंगा घेते आणि सापासमोर कोंबडी वरचढ ठरते. कोंबडी सारख्या सामान्य पक्षाने धोकादायक किंग कोब्रावर मात केल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला. शेवटी आई जिंकते आणि सापाला शेपूट दाबून पळून जावे लागते.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हा व्हिडीओ ViralPosts अकाउंटवरुन ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. जो नेटकऱ्यांना फारच आवडला आहे. लोकांनी या कोंबडीचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी आईच्या प्रेमाविषयी देखील आपली मत मांडली आहेत. हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन शेअर करण्यात आला आहे.