नवी दिल्ली, 30 मार्च : सोशल मीडियावर नेटिझन्सना काय आवडेल, काय नाही हे सांगणं कठीण आहे. एखादा व्हिडीओ किंवा पोस्ट नेटकऱ्यांना आवडली, तर रातोरात कुणी स्टार होईल सांगता येत नाही. आता एका इराणी महिलेचा शोले (Sholey) चित्रपटातील गाण्यावरील डान्स सोशल मीडियावर (Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे. 'जब तक है जान' या गाण्यावर ठेका धरलेल्या इराणी महिलेचा डान्स नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. या पूर्ण व्हिडीओत शोले चित्रपटाचा पूर्ण सीन रिक्रिएट करण्यात आला आहे. तसंच एक जण अभिनेता धर्मेंद्र यांच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत. तर एक जण गब्बरची भूमिका बजावत आहे.
میگن تمام ایران بسیج شدن ساقی این مهمونی رو پیدا کنن پارت ۱ ( پارت ۲،۳ در کامنتها) pic.twitter.com/Ep8btYJ6B2
— Sheri (@Sheri_happy) March 27, 2021
शेरी नावाच्या ट्विटर युजरने याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओत ग्रीन साडी नेसून एका महिला बसंती भूमिका साकारत आहेत. हा परफॉर्मेन्स नेटकऱ्यांना खूपच भावला आहे.
پارت ۲ pic.twitter.com/IIL99JuTmL
— Sheri (@Sheri_happy) March 27, 2021
दुसऱ्या व्हिडीओत जमिनीवर काचा टाकून त्यावर नाचताना व्हिडीओ काढण्यात आला आहे. बसंतीला साजेसा असा डान्स त्या महिलेने केला आहे. काचांवर नाचताना पायाला कुठे इजा होणार नाही याचीही ती काळजी घेताना दिसत आहे.
वजन वाढल्याने मांजरालाही आलं टेन्शन; एक्सरसाइज करतानाचा VIDEO VIRAL
हा व्हिडीओ 27 मार्चला शेअर केला होता. आतापर्यंत 1.50 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओला नेटकरीही मजेशीर कमेंट्स देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Viral videos