मुंबई 28 ऑक्टोबर : हा ट्रेंड सुरु आहे की काही इन्फ्लूएन्सर लोक हे बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्या सोशल मीडियावर शेअर करतात. तसेच ते काही गोष्टींचे फोटो किंवा व्हिडीओ देखील शेअर करतात. असे व्हिडीओ पाहायला युजर्सला देखील आवडते. परंतू बऱ्याचदा काही लोक असे काही व्हिडीओ देखील शेअर करतात. जे आक्षेपार्य असतात. असंच काहीस इंडोनेशियाला फिरायला गेलेल्या एका तरुणीसोबत घडला. ऑस्ट्रेलियात राहणारी 22 वर्षीय इन्फ्लूएन्सर मिकाएला टेस्टा बऱ्याचदा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन काही व्हिडीओ आणि माहिती शेअर करत असते. ती इंडोनेशीयाला फिरायला गेल्यावर तिने तेथील बाजारातील एक असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामुळे खूपच मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली, ज्यामुळे अखेर तिला हा व्हिडीओ आपल्या अकाउंटवरुन काढून टाकावा लागला. हे ही पाहा : Viral Video : बसमध्ये जागा मिळवण्यासाठी तरुणीने लावली अशी युक्ती, पाहून थक्क व्हाल मिकाएला टेस्टा ही इंडोनेशीयामधील मांस बाजाराच्या फिरायला गेली होती. तेथील तिने एक व्हिडीओ बनवला. ती त्या मार्केटमध्ये गेली तेव्हा तिला तेथे विचित्र वास येऊ लागला. तेव्हा तिने पाहिलं की तेथे कुत्र्याचं मटण मिळत आहे. जे पॅके देखील केलं जात आहे. तेव्हा तिने ते दृश्य आपल्या कॅमेरामध्ये कैद केले आणि आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सनी जोरदार विरोध केला होता, त्यानंतर मिकाइलाला हा व्हिडिओ डिलीट करावा लागला होता. मिकायला सध्या इंडोनेशियामध्ये आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ इंडोनेशियाच्या मीट मार्केटचा आहे जिथे वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस उपलब्ध आहे. व्हिडिओमध्ये मिकाईलाने सांगितले की, या मांस मार्केटमध्ये माकड, मगरी, ससे आणि बेडूक तसेच अनेक प्राण्यांचे मांस उपलब्ध आहे. या बाजारात फिरण्याचा अनुभव तिने अतिशय निरुपयोगी असल्याचे सांगितले. या मांसबाजारातून जाताना अतिशय विचित्र वास सहन करावा लागत असल्याचे देखील तिने सांगितले. मिकाईलने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तिने कुत्र्याचे मांस पॅक करताना व्हिडीओ काढला. या व्हिडीओला अनेकांनी विरोध केला. एका व्यक्तीने सांगितले की, कुत्र्याच्या मांसाचा व्यापार करणे बेकायदेशीर आहे, मग असा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची काय गरज होती? व्हिडीओवर टिप्पणी करताना, इंडोनेशियन वापरकर्त्यांनी सांगितले की हे बाजार बंद करण्याची मागणी आधीच केली गेली आहे. त्यात आता मिकाईने हा व्हिडीओ काञसा आहे.
व्हिडीओच्या निषेधानंतर मिकाइलाने माफी मागतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, मिकाइलाने सांगितले की, लोकांना अशा गोष्टी पाहायला आवडणार नाहीत हे मला माहीत नव्हते.