'सोशल डिस्टन्स' ठेवत पार पडलेल्या लग्नाचा VIDEO व्हायरल, काठी वापरून एकमेकांना घातली 'वरमाला'

'सोशल डिस्टन्स' ठेवत पार पडलेल्या लग्नाचा VIDEO व्हायरल, काठी वापरून एकमेकांना घातली 'वरमाला'

या वधूवरांनी सोशल डिस्टंसिंग इतकं मनावर घेतलं आहे की त्यांनी वरमाला घालताना काठीचा वापर केला आहे.

  • Share this:

धार (मध्य प्रदेश), 02 मे : सरकारकडून वेळोवेळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी हे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. मात्र काही ठिकाणी सोशल डिस्टंसिंग किती महत्त्वाचं आहे, हे नागरिकांना चांगलच लक्षात आले आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. टिकटॉकवर सुनिल परमार या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोशल डिस्टंसिंगचं पालन करत वधुवरांनी काठीने एकमेकांना वरमाला घातली आहे.

या व्हिडीओतील वधूवरांनी सोशल डिस्टंसिंग इतकं मनावर घेतलं आहे की त्यांनी वरमाला घालताना काठीचा वापर केला आहे. टिकटॉकवर हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने लिहिलं आहे की, 'जर कुणाला लग्न करायचे असेल तर असं करा'.

@sunilparmar70जिस को शादी करना होतो ऐसे कर सकते हैं@tiktok♬ original sound - sound_for_me_

मंदिरात पार पडलेल्या या लग्नामध्ये सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्यात आले आहे. वधुवरांनी, भटजींनी तसच लग्नाला उपस्थित असणाऱ्या बऱ्यापैकी सर्वांनीच मास्क घातला आहे. त्यामुळे जर लग्न करण्याची खरच एखाद्याला घाई असेल तर असं लग्न करू शकता, असा सल्लाच या टिकटॉक युजरने दिला आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे.

(हे वाचा-'दर 2 महिन्यांनी मीडिया किम यांना मृत घोषित करते', बॉलिवूड कलाकाराचा संताप)

दरम्यान 4 मेपासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यामध्ये ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील काही नियम शिथिल करताना सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर या गोष्टी अनिवार्य आहेत. ज्या काही गोष्टींमध्ये सरकारने सूट दिली आहे त्यामध्ये लांबणीवर पडलेल्या लग्नसोहळ्यांचा देखील समावेश आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये सशर्त लग्न करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामधील महत्त्वाची अट म्हणजे वधूवराकडील एकूण 50 जणांना या लग्नसोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मास्क आणि सोशल डिस्टंसिंग तर बंधनकारक आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 3, 2020, 8:06 AM IST
Tags:

ताज्या बातम्या