मुंबई, 02 मे : गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या मृत्यू झाल्याच्या बातम्या मीडियामध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरत होत्या. मात्र आज किम सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. Pyongyang याठिकाणी एका फर्टिलायझर प्लँटच्या उद्घाटन प्रसंगी किम जोंग उपस्थित होते. त्याठिकाणचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
#WATCH North Korea's Kim Jong Un makes first public appearance in 20 days, at the completion of a fertilisers plant in Pyongyang pic.twitter.com/1OY8W8ORD7
— ANI (@ANI) May 2, 2020
मात्र गेल्या काही दिवसांपासून किम यांच्या प्रकृतीबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत असल्याने एका बॉलिवूड कलाकाराने नाराजी व्यक्त केली आहे. हा बॉलिवूड कलाकार दुसरा-तिसरा कुणी नसून त्याच्या वक्तव्यांमुळे नेहमीच वादामध्ये अडकणारा कमाल आर खान हा आहे. केआरकेने किमच्या प्रकृतीबाबत एक ट्वीट देखील केले आहे. त्याच्या ट्वीटमध्ये केआरके म्हणतो आहे की, ‘भारतीय मीडियामध्ये इरफान खानबद्दल वाईट बोलले गेले तरी मी समजू शकतो. पण मला कळत नाही भारतीय मीडियाला किम जोंग उन यांच्याबाबत काय समस्या आहे. टीआरपी मिळवण्यासाठी ते दर 2 महिन्यांनी ते त्यांना मृत घोषित करतात. आम्हा भारतीयांना त्याच्याबद्दल माहित करून घ्यायला देखील आवडते.’
किम जोंग उन (Kim Jong Un) 15 एप्रिलला त्यांच्या आजोबांच्या जन्मदिन सोहळ्यामध्ये सहभागी झाले नव्हते. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.