जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एका छोट्याशा पक्ष्यासमोर भलामोठा बिबट्याही फेल; कधीच पाहिला नसेल असा शिकारीचा VIDEO

एका छोट्याशा पक्ष्यासमोर भलामोठा बिबट्याही फेल; कधीच पाहिला नसेल असा शिकारीचा VIDEO

एका छोट्याशा पक्ष्यासमोर भलामोठा बिबट्याही फेल; कधीच पाहिला नसेल असा शिकारीचा VIDEO

एका छोट्याशा पक्ष्याने बिबट्याला चांगलाच चकवा दिला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 डिसेंबर : स्नो लेपर्ड (Snow leapord) म्हणजे हिमबिबट्या (Snow leapord video)  ज्याला डोंगरातील बादशाहा किंवा माऊंटन घोस्टही (Ghost Of The Mountain) असंही म्हटलं म्हटलं जातं. बर्फाळ डोंगरात राहणारा हा बिबट्या. शिकार करताना तो इतक्या वेगाने आणि चपळपणे पळतो की पृथ्वीची चुंबकीय क्षमताही त्याच्यासमोर कमीच वाटते. अशा या बिबट्याला एका छोट्याशा पक्ष्याने चांगलाच चकवा दिला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक चिमणी आपल्यासाठी खाणं शोधते आहे. एका डोंगरावर ती बसलेली आहे. तिच्या अगजी जवळ एक स्नो लेपर्ड दबा धरून बसला आहे, हे तिला माहितीही नव्हतं. बिबट्या इतक्या शांतपणे बसला आहे की त्या पक्ष्याला तो दगड आहे की शिकारी हेच समजत नाही.

जाहिरात

बिबट्या संधी साधून त्या पक्ष्यावर हल्ला करायला धावतो आणि पक्षी भुर्रकन उडून जातो. पक्ष्यालाही फसवणं सोपं नाही हेच या व्हिडीओतून दिसून येतो. @AdityaPanda ट्विटर युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ त्यांनी स्वतः शूट केला आहे. गेल्या आठवड्यात ते ट्रान्स हिमालयात स्नो लेपर्डच्या शोधात गेले होते. त्यावेळी हे दृश्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हे वाचा -  रिअल लाईफ ‘टॉम अँड जेरी’; इवल्याशा उंदराने मांजराला नाकीनऊ आणलं, पाहा VIDEO याआधीही स्नो लेपर्डच्या शिकारीचा एक भयंकर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.फक्त   वेगाने पळून नव्हे तर हवेत झेपावत त्याने शिकार केली होती. आयएफएस अधिकारी सुधा रमन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. बिबट्या बर्फाळ डोंगरातून वाऱ्याच्या वेगाने पळत होता आणि  त्याच्या पुढे त्याची शिकार म्हणजे एक ब्लू शीप होती. जीव वाचवण्यासाठी पळता पळता ब्लू शीप डोंगराच्या कडेवरून कोसळली.  पण तरी बिबट्याने तिचा पाठलाग सोडला नाही. बिबट्यानेही त्याच वेगाने डोंगराच्या कडेवरून उडी मारली.  हवेत झेपावत हवेतच त्याने आपला डाव साधला. हे वाचा -  7 वर्षापूर्वी ज्या सिंहिणीला वाचवलं ती समोर आली अन्..; VIDEO पाहून व्हाल हैराण हवेतच बिबट्याने ब्लू शीपला पकडलं. त्यानंतर दोघंही उंचावरून खाली धाडकन आदळतात. दोघंही बऱ्याच अंतरापर्यंत घसरत जातात. त्यावेळी कितीतरी अडथळेही येतात. वेगही इतका असतो की कदाचित बिबट्याच्या तावडीतून त्याची शिकार निसटली असावी असंच वाटतं. पण नाही बिबट्या दुसरा धक्का दिला. बिबट्याने आपल्या तावडीतील शिकार काही सोडली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात