नवी दिल्ली 06 डिसेंबर : माणूस आणि प्राणी यांच्यातील मैत्री अतिशय खास असते. अनेकदा ही मैत्री माणसांमधील मैत्रीपेक्षाही घट्ट असते. माणसांमध्ये स्वार्थ जागा होऊ शकतो, मात्र प्राण्यांच्या बाबतीत कधीच असं घडत नाही. हे प्राणी एकदा आपले मित्र बनले तर ते अनेक वर्ष ही मैत्री निभावतात. असंच काहीसं दृश्य नुकतंच एका जंगलात पाहायला मिळालं, जेव्हा एक व्यक्ती त्याच सिंहिणीला सात वर्षांनंतर भेटला (Man Meet Lioness after 7 Years) ज्याने ही सिंहिण लहान असताना तिचा जीव वाचवला होता (Man Saved life of a Lioness). सध्या फेसबुकवर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अतिशय इमोशनल आणि मनाला स्पर्श करून जाणारा आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की एका व्यक्तीचा सामना अतिशय घातक अशा सिंहिणीसोबत होतो. मात्र व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले जेव्हा या सिंहिणीने या व्यक्तीवर हल्ला करण्याऐवजी त्याला लळा घातला. व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती प्रसिद्ध वाईल्ड लाईफ कंजर्वेश्निस्ट आहे. केविन रिचर्डसन ‘द लायन विस्परर’ नावाने प्रसिद्ध आहेत. सिंहांप्रतीचं त्यांचं प्रेमही जगजाहीर आहे. सध्या त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. फेसबुक पेज द किवीद्वारे पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, केविन एका सिंहीणीला भेटायला सवानाच्या जंगलात गेले होते. या सिंहिणीला त्यांनी सात वर्षांपूर्वी वाचवलं होतं (Man Saved Lioness 7 years Ago). केविनने मेगला तेव्हा वाचवलं होतं, जेव्हा ती लहान होती आणि तिला अवैधपणे तस्करांकडून विकलं जात होतं. केविनने सिंहिणीचा जीव वाचवून तिला सँक्चुरीमध्ये आणलं होतं, यामुळे ती माणसांच्या तावडीतून वाचली. यादरम्यान केविनही आपल्या कामात व्यग्र झाल्यामुळे तिच्यापासून लांबच राहिला. मात्र सात वर्षांनंतर जेव्हा तो या सिंहिणीला भेटायला पुन्हा तिथे गेला तेव्हा तिने केविनला लगेचच ओळखलं.
सुरुवातीला सिंहिणीने केविनला एकटक पाहिलं. हे पाहून असं वाटलं जणू ती ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर ती हळूहळू पाऊलं टाकत केविनकडे आली, जणू ती शिकारीसाठी येत आहे असं वाटू लागलं. मात्र केविनला ओळखताच सिंहिणीने त्याच्याकडे उडी घेतली आणि त्याला चाटू लागली. पाण्यातच जणू ती केविनची गळाभेट घेत होती. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झाले. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.