जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रिअल लाईफ 'टॉम अँड जेरी'; इवल्याशा उंदराने मांजराला अक्षरशः नाकीनऊ आणलं, हा खास VIDEO एकदा बघाच

रिअल लाईफ 'टॉम अँड जेरी'; इवल्याशा उंदराने मांजराला अक्षरशः नाकीनऊ आणलं, हा खास VIDEO एकदा बघाच

रिअल लाईफ 'टॉम अँड जेरी'; इवल्याशा उंदराने मांजराला अक्षरशः नाकीनऊ आणलं, हा खास VIDEO एकदा बघाच

व्हिडिओमध्ये एका लहान उंदराची आणि मांजरीची भांडणं पाहायला मिळतात. व्हायरल व्हि़डिओमध्ये दिसतं की एक लहानसा उंदीर मांजरीला अक्षरशः नाकीनऊ आणतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 06 डिसेंबर : तुम्ही टीव्हीवर अनेकदा उंदीर आणि मांजराची जबरदस्त भांडणं पाहिली (Cat and Mouse Fight) असतील. टीव्हीवरील टॉम अॅण्ड जेरी शो (Tom and Jerry Show) जगभरात प्रसिद्ध आहे. यातील मांजर आणि उंदराची भांडणं सर्वांनीच पाहिली असतील. हा शो लहान मुलांसोबत मोठ्यांच्याही चांगलाच पसंतीस उतरतो. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला रिअल टॉम अॅण्ड जेरी पाहिल्यासारखं वाटेल. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Funny Video of Cat and Mouse) पाहून तुमचं मनही प्रसन्न होईल. या व्हिडिओमध्ये एका लहान उंदराची आणि मांजरीची भांडणं पाहायला मिळतात. व्हायरल व्हि़डिओमध्ये दिसतं की एक लहानसा उंदीर मांजरीला अक्षरशः नाकीनऊ आणतो. तुम्ही पाहू शकता की एक छोटासा काळ्या रंगाचा उंदीर मांजरीला पळवत आहे. व्हिडिओ पाहून असं वाटेल की मांजर या लहानशा उंदराला घाबरत आहे. हा व्हिडिओ पाहायला अतिशय क्यूट आहे. तुम्ही पाहू शकता की मांजर उंदराला पाहून झुडपात लपते. मात्र यानंतरही उंदीर मांजरीला सोडत नाही आणि तिला त्रास देण्यासाठी इकडे-तिकडे शोधू लागतो.

जाहिरात

व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळतं की मांजर पुन्हा एकदा उंदराजवळ येते आणि त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करते. मात्र, तरीही उंदीर मांजरीला घाबरत नाही आणि तिला अद्दल घडवतो. उंदीर पुन्हा एकदा मांजरीला तिथून पळून लावतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर thecutecatvideoss नावाच्या अकाऊंटवरुन शेअऱ केला गेला आहे. आतापर्यंत 13 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 36 लाखाहून अधिकांनी लाईक केला आहे. एका यूजरने या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत लिहिलं ‘क्या बिल्ली बनेगी रे तू.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात