मराठी बातम्या /बातम्या /Viral /सर्पदंश झालेल्या आईला वाचवण्यासाठी लेकीची धडपड; फिल्ममध्ये पाहिलं तसं सापाचं विष तोंडाने काढलं, शेवटी...

सर्पदंश झालेल्या आईला वाचवण्यासाठी लेकीची धडपड; फिल्ममध्ये पाहिलं तसं सापाचं विष तोंडाने काढलं, शेवटी...

आईला साप चावल्यानंतर लेकीने फिल्ममध्ये दाखवतात तशी तिला वाचवण्यासाठी धडपड केली.

आईला साप चावल्यानंतर लेकीने फिल्ममध्ये दाखवतात तशी तिला वाचवण्यासाठी धडपड केली.

आईला साप चावल्यानंतर लेकीने फिल्ममध्ये दाखवतात तशी तिला वाचवण्यासाठी धडपड केली.

  • Local18
  • Last Updated :
  • Karnataka, India

    बंगळुरू, 22 मार्च : एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना नुकतीच कर्नाटक राज्यात पुत्तुरमध्ये घडली. आईच्या पायाला विषारी साप चावला असताना मुलीने रक्त शोषून ते विष बाहेर काढलं व आईचा जीव वाचवला. हा साप मलबार पिट व्हायपर जातीचा विषारी होता. श्रम्या राय असं या धाडसी तरुणीचं नाव आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या पुत्तुरमध्ये ही घटना घडली. तिच्या या धाडसाचं सगळीकडे कौतुक होतंय.

    पुत्तुरमधल्या विवेकानंद महाविद्यालयात श्रम्या राय शिकते, तर तिची आई ममता राय केयुरमधली ग्रामपंचायत सदस्य आहे. पुत्तुरमध्ये असलेल्या आईच्या शेतावर ममता गेल्या होत्या. शेतातला पाण्याचा पंप सुरू करण्यासाठी त्या शेतात गेल्या; मात्र तिथून परतताना चुकून त्यांचा पाय सापावर पडला. तो साप मलबारी चापडा म्हणजेच मलबार पिट व्हायपर होता. अंगावर पाय पडल्याने त्याने त्यांच्या पायाला दंश केला.

    सर्पदंशानंतर चिमुकला वाचला, चावणाऱ्या सापाचाच मृत्यू; मृत सापाला घेऊन मुलाच्या कुटुंबाची रुग्णालयात धाव

    तो विषारी साप असल्याचं त्यांच्या लश्रात आलं; म्हणून त्यांनी विष अंगात पसरू नये यासाठी वाळलेल्या गवताची दोरी करून दंश केलेल्या भागाच्या वर बांधली. गवताची दोरी जास्त काळ रक्तप्रवाह रोखू शकणार नाही, याचा अंदाज त्यांची मुलगी श्रम्याला आला. त्यामुळे तिनं तातडीनं आईच्या पायातून रक्त शोषून ते विष बाहेर काढलं. त्यानंतर ममता यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलगी श्रम्यानं वेळेत हे काम केल्यामुळे ममता यांचा जीव वाचू शकला.

    महाविद्यालयात स्काउट आणि गाइडची रेंजर असलेल्या श्रम्याचं या धाडसासाठी खूप कौतुक होतंय. शरीरातून विष बाहेर काढण्याच्या या प्रक्रियेबाबत आपण ऐकलं होतं व चित्रपटांमध्येही पाहिलं होतं, असं श्रम्यानं सांगितलं. ममता यांच्यावर एक दिवस रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं.

    विकसनशील देशांमध्ये सार्वजनिक आरोग्य या विषयात साप चावण्याची समस्या खूप गंभीर आहे. नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जगभरातल्या सर्पदंशाने होत असलेल्या 78,600 मृत्यूंपैकी 64,100 मृत्यू भारतात झाले आहेत.

    2 वर्षीय चिमुकल्याने आधी विषारी सापाला पळव पळव पळवलं, नंतर...; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

    काही साप खूप विषारी असतात. ते चावल्यावर काही काळातच मृत्यू ओढवू शकतो. नागही अत्यंत विषारी असतो. तसंच, मलबार पिट व्हायपरही विषारी असतो. ममता यांचा पाय सापावर पडल्यानं त्यांना सर्पदंश झाला; मात्र त्यांच्या मुलीनं तत्परता आणि प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला.

    First published:
    top videos

      Tags: Daughter, Karnataka, Local18, Mother, Snake, Viral