कॅनबेरा, 16 मार्च : साप म्हटलं तरी कित्येकांच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. पण एक दोन वर्षांचा चिमुकला अशाच सर्वात खतरनाक सापामागे गेला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा मागे त्याचं कुटुंबही गेलं. पण शेवटी जे दृश्य दिसलं ते पाहून कुटुंबही हादरलं. कुटुंबाला असं काही दिसलं ज्यामुळे सर्वांना घाम फुटला. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील हे प्रकरण चर्चेत आलं आहे. एक दोन वर्षांचा हा चिमुकला आपल्या घराच्या मागे खेळत होता. तेव्हा त्याला एक साप दिसला. मुलाला वाटलं ते खेळणं आहे म्हणून तो त्या सापाच्या मागे मागे गेला. सापाचा पाठलाग करत करत चिमुकला सापाच्या बिळापर्यंत पोहोचला. तो सापाला हातात धरण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात त्याच्या कुटुंबातील सदस्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ते त्याच्याजवळ धावत गेले. त्यांनी जे पाहिलं त्यानंतर त्यांना धक्काच बसला. मुलगा आणि सापामध्ये बस्सं मोजकंच अंतर होतं. कसंबसं करून त्यांनी मुलाला सापापासून दूर खेचून घेतलं. सुदैवाने सापाने मुलावर हल्ला केला नाही. सर्पदंशानंतर चिमुकला वाचला, चावणाऱ्या सापाचाच मृत्यू; मृत सापाला घेऊन मुलाच्या कुटुंबाची रुग्णालयात धाव वाइल्ड कन्झर्व्हेशनच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं. त्यांनी सापाला पकडलं. पण तिथं सापाची अंडी सापडली. तब्बल 110 अंडी होती. त्याची तपासणी केली असता ही दुर्मिळ प्रजातीच्या सापाची अंडी असल्याचं समजलं.
कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की एका महिन्यात त्यांनी कित्येकदा आपल्या बागेत हॅचिंग सापांना पाहिलं आहे. जेव्हा खोदकाम केलं तेव्हा मोठं बिळही दिसलं होतं. याच बिळात ही अंडी होती. खतरनाक किंग कोब्राला वाचवायला गेला तरुण, विहिरीत उतरताच…; अंगावर काटा आणणारा VIDEO बिझनेस इनसाइडरच्या वृत्तानुसार कर्मचाऱ्यांनी सांगितलं हा ईस्टर्न ब्राऊन स्नेक होता. जो जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक मानला जातो. जगातील सर्वात विषारी असा हा दुसरा साप आहे. बिलबोंग अभयारण्याच्या माहितीनुसार ३ फूट लांब असलेले हे काळ्या रंगाचे साप खूप खतरनाक असतात. त्यांचं विष इतकं भयानक असतं की माणसाचं हदय, फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्या निष्क्रीय होऊ शकतात. ऑस्ट्रेलियात बरेच साप याच प्रजातीचे आहे. जिथं अंडी सापडली तिथं खूप साप असल्याचं सांगितलं जातं आहे.