नवी दिल्ली 16 जून : साप असा प्राणी आहे, ज्याला पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. साप लहान असो वा मोठा, त्याची भीती सारखीच असते. दुरून साप पाहूनही लोक थरथर कापतात, मग कल्पना करा की घरात कधी साप दिसला तर काय होईल? नक्कीच घरातील लोकांच्या पायाखालची जमीन सरकेल. थरकाप उडायला लागेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये घराच्या पंख्यामध्ये साप अडकलेला दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ती व्यक्ती पंख्यावरुन साप काढण्यासाठी काहीही करत नाही, फक्त शांत बसून त्याचा व्हिडिओ बनवत असल्याचं दिसतं. चालत्या पंख्यात अडकलेला साप जर खाली आला तर त्याचं काय होईल, याची त्याला अजिबात भीती वाटत नाही. Viral Video : ‘तू खिच मेरी फोटो…’ सुपर मॉडेल किंग कोब्राचा नखरा पाहिला का? व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आरामात टीव्ही पाहत असल्याचं दिसून येतं. इतक्यात पंख्यावर साप दिसताच तो त्याचा व्हिडिओ काढू लागतो. पंख्याच्या काठीला साप गुंडाळला जातो. यावेळी जेव्हा तो खाली उतरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं डोकं फिरत्या पंख्याच्या ब्लेडवर अनेक वेळा आदळतं. साप ज्या पद्धतीने धडकतो, ते पाहून असं वाटतं की आता त्याचा शेवट निश्चित आहे. मात्र, साप काही सेकंदांसाठी मागे सरकतो आणि नंतर परत ब्लेडकडे वळतो.
चालत्या पंख्याच्या ब्लेडवर साप येताच तो आदळतो आणि व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीवर पडतो. त्यानंतर हा व्यक्ती जोरजोरात ओरडू लागतो. यासह व्हिडिओ संपतो. ज्या पद्धतीने साप पंख्याला आदळला आणि खाली पडला त्यावरून त्याला जीव गमवावा लागला असावा असं वाटतं. कारण पंखा खूप वेगाने सुरू होता. हा व्हिडिओ “@arabbird” नावाच्या इंस्टाग्राम वापरकर्त्याने शेअर केला आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या यूजर्सनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, ‘हेलिकॉप्टर वाला साप’. तर दुसर्या यूजरने लिहिलं की, ‘मला असं वाटलं की हा साप माझ्यावर पडला आहे’. या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.