जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : 'तू खिच मेरी फोटो...' सुपर मॉडेल किंग कोब्राचा नखरा पाहिला का?

Viral Video : 'तू खिच मेरी फोटो...' सुपर मॉडेल किंग कोब्राचा नखरा पाहिला का?

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आता ‘सुपर मॉडेल’ कोब्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 जून : सापांचे असंख्य व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर दिसतील. यासंदर्भात अनेक बातम्या देखील वारंवार समोर येत आहेत. खरंतर उन्हाळ्यात गर्मीने व्यकूळ झालेले साप पाण्याच्या शोधात बाहेर पडतात. ज्यामुळे त्यांच्यासंबंधीत अनेक घटना समोर आल्या. कधी सापाने दंश केल्याचा. तर कधी नाग नागिणीचा व्हिडीओत, तर साप कधी वानरावर हल्ला करताना दिसला. त्यानंतर आता ‘सुपर मॉडेल’ कोब्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ‘सुपर मॉडेल’ यासाठी कारण या सापाचे फोटो काढले जात आहेत आणि साप देखील एखाद्या मॉडेल प्रमाणे पोज देताना दिसत आहे. त्यामुळे जो कोणी हा व्हायरल व्हिडीओ पाहात आहे तो या सापाच्या प्रेमात पडत आहे. कारण सापाचं असं रुप पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे. King Cobra : साप खरंच मीठाचं वर्तुळ पार करु शकतो का? व्हिडिओत जे घडलं त्याची कल्पना करू शकत नाही कोणत्याही प्रोफेशनल्स प्रमाणे हा किंग कोब्रा फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसला. यानंतर या सापाचे आलेले फोटो ही थक्क करणारे आहेत. कोब्राचे असे फोटो यापूर्वी कोणीही पाहिले नव्हते.

जाहिरात

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, याआधी किंग कोब्रा किंवा पायथनच्या अशा फोटोंसाठी मोठमोठ्या फोटोग्राफर्सना ऍमेझॉनसारख्या जंगलात फिरावे लागत होते, मात्र हे फोटोशूट आफ्रिका, ब्राझील किंवा अमेरिकेच्या जंगलात झाले नव्हते तर स्टुडिओमध्ये झाले होते. जे खरंच आश्चर्यकारक आहे. खरंच नागाला मारल्यावर नागीण बदला घेते? सापांसंबंधीत काही मान्यता आणि सत्य जिथे या कोब्रासमोर मोठमोठे सुपरमॉडेल्सही अपयशी ठरल्यासारखे वाटत होते. इन्स्टाग्रामच्या व्हेरिफाईड हँडल nathanjordan_photography ने शेअर केलेल्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर लोकांच्या विचित्र प्रतिक्रिया येत आहेत. किंग कोब्राच्या फोटोशूटचा हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या प्रत्येक स्तरावर हिट होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात