मुंबई, 07 ऑगस्ट : पाण्यात मगरीचं (Crocodile) राज्य असतं, तिथं तिच्याशी वैर (Crocodile Video) घेऊ नये असं म्हणतात. पाणी प्यायला आलेला प्राणी (Animal video) मगरीच्या तावडीत सापडला तर त्याची सुटका अशक्यच. असाच पाणी पिण्यासाठी आलेल्या एका हत्तीवर (Elephant) मगरीने हल्ला केला. पण हत्तीने (Elephant video) बाजीच पलटवली.
पाणी पिण्यासाठी नदीवर आलेल्या हत्ती मगरीने हल्ला (Elephant and crocodile fight) करायला येताच इतका राग आला की हल्ला (Crocodile attack on elephant) करायला आलेल्या मगरीलाच (Elephant and crocodile) त्याने अद्दल घडवली. मगरीच्या शेपटीला धरून त्याने तिला पाण्यातच आपट आपटलं (Elephant attack on crocodile). हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.
Survival of the Fittest!! #wildlife pic.twitter.com/hFWV0va033
— HGS Dhaliwal (@hgsdhaliwalips) August 7, 2021
व्हिडीओत पाहू शकता एक छोटा हत्ती पाण्यात उभा आहे. त्याच्या पायाजवळच एक मगर आहे.
हे वाचा - महापौर कार्यालयात भूत? गार्डवर हल्ला; महापौरांनी शेअर केला Horror video
हत्ती मगरीवर पाय देताना दिसतो आहे. मध्येच तो सोंडेने तिला फिरवतो. त्यानंतर तिची शेपटी आपल्या तोंडात धरून तिला उलटंसुलटं करून पाण्यातच आपटतो. मगरीची अवस्था इतकी भयंकर झाली आहे की तिला हलताही येत नाही. बिचारी पाण्यात तशीच पडून राहिली आहे.
हत्ती इतका संपत्प झाला आहे, की त्याने मगरीचं राज्य असलेल्या पाण्यातच तिला हरवलं आहे. पाण्यात मगर कितीही ताकदवान असली तरी हत्तीसमोर तिचं काहीच चाललं नाही हेच दिसून येतं आहे. आयपीएस अधिकारी एचजीएस धालिवाल यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. शक्तिशाली आहे तेच जिवंत राहू शकतात. हाच जंगलाता नियम आहे, असं त्यांनी या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
हे वाचा - दाखवून द्या तुम्हीच आहात हुश्शार! फक्त 7 सेकंदात या फोटोतले 4 किडे शोधा
हत्तीने मगरीवर केलेला हा हल्ला पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. व्हिडीओ पाहून डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crocodile, Elephant, Viral, Viral videos, Wild animal