नरेश पारीक, प्रतिनिधी
अजमेर, 09 मार्च : साप म्हणताच अनेकांना घाम फुटतो. साप चावल्यानंतर मृत्यू झाल्याची बरीच प्रकरणं आहेत. असाच साप एका चार वर्षांच्या चिमुकल्याला चावला. त्यानंतर चिमुकल्यासह सापाला घेऊन त्याचं कुटुंब रुग्णालयात पोहोचलं. पण सापाचा मृत्यू झाला होता. साप मृत होता. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यामधील ही धक्कादायक घटना आहे.
रूकसनगर गावात राहणारा 4 वर्षांचा मयंक आपल्या कुटुंबासोबत शेतात गेला होता. तो पाण्याच्या कुंडाजवळ खेळत होता. तेव्हा त्याच्यावर विषारी सापाने हल्ला केला. रसेल वाइपर प्रजातीचा हा साप त्याला चावला. त्यानंतर मयंकच्या कुटुंबाने त्याला घेऊन लगेच रुग्णालयात धाव घेतली. जिल्हा रुग्णालयातील आपात्कालीन विभागात त्याला नेलं. तिथं त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले नंतर हायर सेंटरला पाठवण्यात आलं.
VIDEO - तडफडत होता साप म्हणून वाचवायला गेला तरुण; तोंडातून असं काही बाहेर आलं की...
मयंकचं कुटुंब मयंकसह सापालाही घेऊन आलं होतं. हा साप मृत होता. मयंकला दंश केल्यानंतर त्याच्या कुटुंबाने त्या सापाला मारलं होतं आणि त्याला डब्यात बंद करून रुग्णालयात आणलं. कुटुंबाने सांगितलं की बऱ्याचदा डॉक्टरांना कोणता साप चावला हे समजत नाही आणि मग उपचार करण्यात समस्या येते. सापाच्या प्रजातीबाबत माहिती झाली तर त्याच्या विषावर उपचार करणं सोपं होतं आणि संबंधित व्यक्तीचा जीव वाचवता येतो.
चुरू जिल्ह्यात सापाच्या जवळपास 18 प्रजाती आहेत. त्यापैकी 14 विषारी नसतात. नाग किंवा कोब्रा, पिऊना, रसेल वाइपर आणि सॉ स्केल वायपर हे चार साप विषारी असतात. या चौघांपैकी कोणताही साप चावला आणि संबंधित व्यक्तीला वेळेत उपचार मिळाले नाही तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, साप आक्रमक नसतात पण त्यांना त्रास दिल्यास रागात ते हल्ला करतात.
4 वर्षांच्या मुलाला चावताच कोब्राचा मृत्यू
जून 2022 मध्ये बिहारमध्ये एका चार वर्षांच्या चिमुकल्याल खतरनाक विषारी कोब्रा चावला. त्या चिमुकल्याला काही झालं नाही पण सापाचा मृत्यू झाला, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
'हा मला चावला, माझ्यावर उपचार करा'; रुग्णालयात असं काही घेऊन आली महिला, डॉक्टरांनाही धक्का
गोपालगंजमधील माधोपूर गावात राहणारा चार वर्षांचा अनुज कुमार आपल्या मामाच्या गावी सासामुसा खजुरी टोलाला गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळच्या वेळेला तो घराच्या दरवाजाजवळ इतर मुलांसोबत खेळत होता. त्याचवेळी शेतातून एक कोब्रा वेगाने त्यांच्या दिशेने आला. क्रोबा सापाने अनुजच्या पायाला दंश केला. अनुजला साप चावताच इतर मुलं घाबरली आणि ती भीतीने तिथून पळू गेली.
तिथं काही मोठे लोक होते, त्यांचं लक्ष त्या सापाकडे गेलं. तेव्हा त्यांनी अनुजला सापापासून वाचवण्यासाठी धाव घेतली. हातात काठी घेऊन ते सापाला मारायला गेले. पण त्याआधीच सापाचा तडफडून मृत्यू झाला होता. पण ज्या अनुजला हा साप चावला त्याला काहीच झालं नाही. तो आपला पुन्हा खेळू लागला. पाच फूट लांबीचा हा साप होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.