जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - तडफडत होता साप म्हणून वाचवायला गेला तरुण; तोंडातून असं काही बाहेर आलं की...

VIDEO - तडफडत होता साप म्हणून वाचवायला गेला तरुण; तोंडातून असं काही बाहेर आलं की...

सापाचा व्हिडीओ व्हायरल.

सापाचा व्हिडीओ व्हायरल.

सापाने असं काही गिळलं की तो तडफडत होता, त्याला वाचवायला गेलेल्या तरुणाने त्याच्या तोंडातून जे बाहेर काढलं ते धक्कादायक आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 12 फेब्रुवारी : सापा चे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी सापाच्या फायटिंगचा, शिकारीचा तर कधी सापाने माणसांवर हल्ला केल्याचे व्हिडीओ. पण सध्या एक असा व्हिडीओ चर्चेत आला आहे जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. ज्यात एक साप जीवनमृत्यूशी झुंज देत होता. शेवटी एका माणसाने त्याचा जीव वाचवला आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. साप म्हटलं की अनेकांना भीती वाटते. त्यामुळे त्याचा जीव धोक्यात असला तरी कोण शक्यतो त्याचा जीव वाचवण्याची हिंमतही करणार नाही. पण एका व्यक्तीला सापाला जीवनमृत्यूशी झुंज देताना पाहून राहावलं नाही. त्यामुळे तो त्याच्या मदतीसाठी धावून गेला. स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्याने सापाला वाचवण्याचा प्रयत्न केला. हे वाचा -  VIDEO - अंगावर आलेल्या खतरनाक सापाला मांजरीने धरलं तोंडात; कचाकचा चावलं शेवटी… व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती एका डब्यात सापाला घेऊन येतो. जमिनीवर तो डबा उघडतो आणि सापाला बाहेर काढतो. त्यानंतर एका हातात सापाची शेपटी धरतो आणि दुसऱ्या हातात एक आकडा असलेली काठी. तुम्ही नीट पाहिलं तर सापाच्या शेपटीजवळील भाग तुम्हाला फुगल्यासारखा दिसेल. त्यानंतर या व्यक्तीने त्या सापाला पकडून आणलं आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याने हातांनी आणि काठीने सापाच्या शरीरातील ती वस्तू पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. जशी ती वस्तू सापाच्या मध्यभागातून थोडं पुढे आली तसं त्याने फक्त सापाची शेपटी धरून ठेवली. हे वाचा -  खतरनाक किंग कोब्राला वाचवायला गेला तरुण, विहिरीत उतरताच…; अंगावर काटा आणणारा VIDEO त्यानंतर साप स्वतःच शरीरात अडकलेली ती वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. हळूहळू करत त्याने ती वस्तू ओकून तोंडाबाहेर काढलं. तुम्हाला पाहून धक्का बसेल, ती वस्तू म्हणजे चक्क एक प्लॅस्टिकचा पाइप आहे. प्लॅस्टिक शरीराबाहेर येताच सापाला बरं वाटलं. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या सापाला जंगलात सोडून दिलं.

जाहिरात

इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. सापाला वाचवणाऱ्या या तरुणाचं कौतुक केलं जातं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात