मुंबई, 21 नोव्हेंबर : पृथ्वीपासून कित्येक अंतरावर दूर असलेला सूर्य. पण त्याच्या उष्णतेचे चटके पृथ्वीवरही लागतात. यावरूनच सूर्याच गोळा किती तप्त असेल याची कल्पना आपल्याला येतेच. इतका लांब असूनही उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेने कित्येक बळी जातात. त्यामुळे सूर्यावर एखादा जीव काय सूर्याच्या आसपासही कुणी राहू शकत नाही. त्यामुळे सध्या व्हायरल होत असलेल्या सूर्याच्या व्हिडीओने सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. सूर्यावर चक्क एक साप दिसला आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या सोलर ऑर्बिटरने सूर्याचा हा व्हिडीओ बनवला आहे. ज्यात सूर्याच्या पृष्ठभागावर एक साप पळताना दिसला. हा व्हिडीओ पाहून शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत. ESA च्या शास्त्रज्ञांनी याला सर्पेंट इनसाइड सन असं म्हटलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. हे वाचा - हवेपासून पाणी तयार करणारं मशीन बाजारात, हे कसं काम करणार? वाचा सविस्तर सूर्याच्या खालील भागाला नीट पाहा. तिथून एक सापासारखं काहीतरी वरच्या दिशेने चालत जाताना दिसतं. अगदी काही सेकंदात सापासारखी सरपटत जाणारी ही आकृती सूर्याच्या खालील भागाहून वरच्या भागात जाते. पण सूर्यासारख्या आगीच्या गोळ्यात जिथं कोणताच जीव टिकू शकत नाही, अशा ठिकाणी खरंच साप आहे का? सापासारखी दिसणारी ही आकृती नेमकी काय?
This Insane Video Will Make You Believe There's a Serpent Inside The Sun https://t.co/Guz9EjRsEg
— ScienceAlert (@ScienceAlert) November 17, 2022
5 सप्टेंबर 2022 रोजी सोलर ऑर्बिटरने हे दृश्य टिपलं जेव्हा ते सूर्याच्या एकदम जवळ होतं. खरं तर सूर्यात दिसलेला हा साप म्हणजे खरा साप नव्हे तर सौर लहर आहे. एका मोठ्या सौर विस्फोटहून निघणारी सौर लहर आहे. जी सापासारखी चालताना दिसते आहे. हे वाचा - मेंढ्यांच्या या VIDEO ने अख्ख्या जगाला टाकलंय कोड्यात; त्यांच्या विचित्र वागण्याचं कारण काय? सूर्यामध्ये अशा सौर लहरी येत असतात, याला पेरिहेलियॉन म्हटलं जातं. पण सापाच्या आकाराची ही लहर दुर्मिळ दृश्य आहे.