लखनऊ, 07 एप्रिल : साप चावल्याची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. टॉयलेट सीटवर बसल्यानंतर सर्पदंश झाल्याचीही काही प्रकरणं आहेत. पण आता सर्पदंशाची अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. एका तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला साप फक्त चावला नाही, तर साप त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घुसला आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील ही धक्कादायक घटना आहे. हरदोई जिल्ह्यातील बनियानी पूर्वा गावातील हा तरुण शौचासाठी बाहेर गेला होता. काही वेळाने तो ओरडत घरी आला. आपल्या प्रायव्हेट पार्टला काळा कीडा चावला आणि तो आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये गेला असं त्याने आपल्या कुटुंबाला सांगितला. तो साप होता, अशी भीती त्याने व्यक्त केली. त्यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.
हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये त्याला आणण्यात आलं. त्याच्या पोटात तीव्र वेदनाही होत होत्या. तरुणाने डॉक्टरांना प्रायव्हेट पार्टमध्ये आपल्या पोटात साप शिरल्याची माहिती दिली. ते ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसला. डॉक्टरांनी त्याचे रिपोर्ट केले. तेव्हा त्याच्या प्रायव्हेट पार्ट किंवा पोटात तसं काहीच दिसलं नाही. Snake in plane : बापरे! उडत्या विमानात साप, पाहून पायलटला फुटला घाम; जीव वाचवण्यासाठी घाईघाईत… डॉक्टरांनी सांगितलं की तरुणाच्या पोटात काहीच नव्हतं. तरुण दारूच्या नशेत होता. नशेमुळेच त्याच्या पोटात वेदना होत होत्या आणि तो काहीही बोलत होता. शौच करताना एखादं लाकूड लागलं त्याच्या प्रायव्हेट पार्टला लागलं. पण त्याला साप चावला आणि तो आत घुसला असं वाटलं. तोंडात गेला साप याआधीही सापाचा एक शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात डॉक्टर एका महिलेच्या तोंडातून साप बाहेर काढताना दिसले. माहितीनुसार ही महिला झोपली असताना तिच्या तोंडात साप गेला. तब्बल 4 फूट लांबीचा हा साप. ही महिला इतकी गाढ झोपली होती की साप तिच्या तोंडात घुसला तरी तिला समजलं नाही. जेव्हा समजलं तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली. Video : स्कूटीच्या हँडलमधून येत होता आवाज, चालकाने नीट पाहिलं तेव्हा बसला धक्का डॉक्टरांनी साप तिच्या तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एका खास स्टिकमार्फत तिच्या तोंडातून हा साप खेचून बाहेर काढण्यात आला.