जाहिरात
मराठी बातम्या / Viral / घराजवळ दबा धरून बसला होता साप, महिला बाहेर येताच...; CCTV मध्ये कैद झालं खतरनाक दृश्य

घराजवळ दबा धरून बसला होता साप, महिला बाहेर येताच...; CCTV मध्ये कैद झालं खतरनाक दृश्य

घराजवळ दबा धरून बसला होता साप, महिला बाहेर येताच...; CCTV मध्ये कैद झालं खतरनाक दृश्य

महिला समोर दिसताच घराबाहेरील सापाने…

  • -MIN READ
  • Last Updated :

ऑस्टिन, 10 सप्टेंबर : आपल्यासाठी सर्वात सुरक्षित कोणतं ठिकाण असतं ते म्हणजे आपलं घर. पण अशाच घरासमोर एखादा भयंकर प्राणी दबा धरून बसला आणि तो अचानकपणे आपल्यासमोर आला तर काय होईल? एका महिलेचा अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. साप (Snake video) शब्दानेही किती तरी जणांना भीती वाटतं. असा साप अचानक आपल्या समोर आला तर आपला निम्मा जीव गेल्यातच जमा नाही का? असाच साप या महिलेला तिच्या घराबाहेर दिसला (Snake outside home). त्यानंतर पुढे काय झालं, हे सर्व घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं (Snake attack video).

व्हायरल हॉग युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक महिला घरातून बाहेर पडतं. थोडं पुढे गेल्यावर तिथं एका रोपं ठेवण्यात आली आहे. तिथं कुंडीजवळ जाताच तिथून अचानक एक साप बाहेर येतो. हे वाचा -  बुडणाऱ्या पिल्लासाठी हत्तींची धडपड; पाण्यात उडी मारत वाचवला जीव पाहा VIDEO अचानक सापाला समोर पाहून महिला खूप घाबरते. भीतीने ती किंचाळते आणि तशीच ओरडत पुन्हा आपल्या घराच्या दिशेने धावते. ती घरात जाते आणि घराचा दरवाजा लावून घेते. ही सर्व घटना घराबाहेर लावण्यात आल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. मीडिया रिपोर्टनुसार ही घटना टेक्सासमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. चौंवा स्मिथ लेकोम्टे असं या महिलेचं नाव असल्याची माहिती मिळते आहे. ती घराबाहेर आपल्या आईसोबत बसायला जात होती, तेव्हा झाडांमधून अचानक साप बाहेर पडला. हे वाचा -  झोपलेल्या चिमुकल्यांजवळ जाऊन कुत्र्याने असं काही केलं; CCTV पाहून थक्क व्हाल सुदैवाने साप तिला चावला नाही. पण ही घटना त्या महिलेसाठी आणि आपल्यासाठीही धडकी भरवणारीच आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात