व्हिडीओत पाहू शकता एक हत्ती आपल्या पिल्लासोबत एका पाणी पित आहे. पाणी पिता पिता अचानक पिल्लाचा पाय घसरतो आणि तो त्या पाण्यात पडतो. पाणी थोडं खोल आहे. त्यामुळे पिल्लू गटांगळ्या खातं. पाण्यातून बाहेर पडण्यासाठी ते आपले पाय मारतं. हे वाचा - झोपलेल्या चिमुकल्यांजवळ जाऊन कुत्र्याने असं काही केलं; CCTV पाहून थक्क व्हाल त्याच्यासोबत असलेली त्याच आई त्याला वाचवण्यासाठी धडपड करतेच. पण त्यांच्यापासून थोड्या अंतरावर असलेला हत्तीसुद्धा तिथं धावत येतो. मग दोघंही पाण्यात उतरतात. पळत पळत पिल्लाजवळ जातात आणि दोघं दोन्ही बाजूंनी त्याला धरतात. हळूहळू करत ते त्याला जिथं पाणी खोल नाही त्या भागाजवळ नेतात आणि नंतर पाण्यातून बाहेर आणतात. हे वाचा - अरे बापरे! थेट कारवरच चढलं अस्वल आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO hopkinsBRFC21 ट्विट्र अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.This is truly amazing ❤️ pic.twitter.com/lwCAsgBRbW
— ❤️ A page to make you smile ❤️ (@hopkinsBRFC21) September 7, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elephant, Viral, Viral videos, Wild animal