Home /News /viral /

...अन् शिकारीच झाला शिकार, एका क्षणात खेळ खल्लास; पाहा थरारक VIDEO

...अन् शिकारीच झाला शिकार, एका क्षणात खेळ खल्लास; पाहा थरारक VIDEO

त्याच्या नजरेने सावज टिपला पण तिथं दबा धरून बसलेला शिकारी त्याच्या नजरेतून चुकला.

  मुंबई, 08 सप्टेंबर : आपण सर्वांनी शाळेत असताना अन्नसाखळीचा (Food chain) अभ्यास केलाच आहेत. आतापर्यंत फोटोमध्ये आपण ही अन्नसाखळी पाहिली आहे. पण अशाच अन्नसाखळीचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. शिकार करायला आलेला शिकारी शिकार झाला (Animal hunting video). प्राण्यांच्या (Animal video) शिकारीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. पण काही व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात (Bird attack on insect). असाच हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Snake attack on bird). ज्यातून निसर्गाचा नियम स्पष्ट होतो.
  व्हिडीओत पाहू शकता एका खडकावर एक छोटासा कीटक चालताना दिसतो आहे. तितक्यात एक पक्षी त्याच्या दिशेने हवेत येतो. त्याच्यावर हल्ला करतो. त्याला आपल्या चोचीत धरतो तोच पुढे असं काही घडतं की पाहून आपल्यालाही धक्का बसतो. हे वाचा - तरुणाच्या अंगात संचारला 'भल्लालदेव'; बैलाची शिंगं धरली आणि... Shocking Video ज्या दगडावरील किटकावर या पक्ष्याने हल्ला केला. त्याच दगडावर त्याचा शिकारीही दबा धरून बसला होता. या दगडावर भलामोठा साप होता. जेव्हा पक्ष्याने किटकावर हल्ला केला त्याच्या दुसऱ्याच क्षणी सापाने पक्ष्यावर हल्ला केला. शिकारी स्वतःच शिकार झाला. या पक्ष्याने आपल्या तीक्ष्ण नजरेने दगडावरील आपला छोटासा सावज तर टिपला पण आपली शिकार करण्यासाठी लपून बसलेला भला मोठा साप त्याच्या नजरेतून चुकला. जगण्यासाठी आपलं अन्न शोधायला गेलेला हा पक्षी गेला पण तिथंच त्याने जीव गमावला. हे वाचा - Video - छोटासा साप समजून शेपटी खेचली आणि समोर आला...; पाहून तरुणाला फुटला घाम निरंजन महापात्रा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहून अक्षरशः धडकीच भरते.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Shocking viral video, Snake, Snake video, Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या