• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Shocking video! छोटासा साप समजून शेपटी खेचली आणि समोर आला...; पाहून तरुणाला फुटला घाम

Shocking video! छोटासा साप समजून शेपटी खेचली आणि समोर आला...; पाहून तरुणाला फुटला घाम

सापाची शेपटी त्याने धरली आणि पुढे जे घडलं ते पाहून हादराल.

 • Share this:
  बंगळुरू, 07 सप्टेंबर : समोर साप (Snake) दिसला तरी आपल्याला घाम फुटतो. काही लोक साप (Snake video) पकडण्यात तरबेज असतात. साप म्हणजे काहीच नाही असं त्यांना वाटतं. त्यामुळे अगदी एखादी दोरी पकडावी तसे ते हातात सापाला पकडतात (Snake shocking video). सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात छोटासा साप समजून एका तरुणाने त्याची शेपटी खेचली पण त्याच्यासमोर जे आलं ते पाहून (King kobra video) त्याला घाम फुटला. गारूडी असलेला एक तरुण साप पकडण्यासाठी पोहोचला. दरवाजाजवळ या सापाची शेपटी होती. त्याने शेपटीला धरलं आणि सापाला खेचलं. जशी त्याने सापाची शेपटी खेचली तसा त्याला धक्काच बसला. ज्या सापाला हा गारुडी छोटासा समजत होता तो चक्क किंग कोब्रा होता. जशी त्याने त्याची शेपटी खेचली आणि त्याला ओढलं. तसा हा किंग कोब्रा त्याच्या समोर अचानक आला आणि फणा काढून उभा राहिला. हे वाचा - OMG! रिअल Donald duck, चक्क माणसासारखा बोलतो हा बदक; पाहा VIDEO जसा कोब्रा दिसला तसा गारूडीसुद्धा घाबरला. त्याला घामच फुटला. जी काठी सापाला पकडण्यासाठी त्याने आपल्या हातात घेतली होती तीसुद्धा भीतीने फेकून दिली आणि तो मागेच हटला. आपली शेपटी दुमडून फक्त फणा काढून  जवळपास या व्यक्तीच्या उंचीइतकाच तो दिसत होता. मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचं सांगितलं जातं आहे. एका बाथरूममध्ये हा साप होता. जवळपास 14 फूट लांबीचा हा कोब्रा. सुदैवाने गारूडी वेळीच त्याच्यापासून दूर झाला. त्यामुळे त्याला काही झालं नाही. नाहीतर साप इतका रागात होता की त्याने गारूड्याला दंश केलाच असता. हे वाचा - VIDEO : घरात शिरत होता विषारी साप; पुढे महिलेनं जे केलं ते पाहून कौतुकाचा वर्षाव आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सापाला पकडण्यापूर्वी अनेकदा विचार करावा, विशेषतः जेव्हा तो किंग कोब्रा असेल तर, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published: