Home /News /viral /

खतरनाक! तरुणाच्या अंगात संचारला 'भल्लालदेव'; बैलाची शिंगं धरली आणि... Shocking Video

खतरनाक! तरुणाच्या अंगात संचारला 'भल्लालदेव'; बैलाची शिंगं धरली आणि... Shocking Video

बैलाशी फाइट करणाऱ्या तरुणाचा धक्कादायक व्हिडीओ.

    मुंबई, 07 सप्टेंबर : बैलांशी (Bull) पंगा घेणं चांगलंच महागात पडतं. आतापर्यंत तुम्ही बैलांनी भल्याभल्यांना (Bull video) आपल्या शिंगावर धरून जमिनीवर आपटल्याचे बरेच व्हिडीओ पाहिले असतील (Bull attack video). पण सध्या सोशल मीडियावर (Social media) बैलाचीच शिंग (Man fight with bull) धरून त्याला जमिनीवर पाडणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. चवताळलेल्या बैलाशी (Angry bull) फाईट करणारा फिल्ममधील भल्लालदेव (Bhallaldev) तुम्हाला आठवत असेल. असाच भल्लालदेव जणू या व्यक्तीच्या अंगात संचारला आणि त्याने बैलासोबत भयंकर कृत्य केलं. व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती नशेत दिसते आहे. एका बैलाच्या मागे ती धावत गेली आणि बैलाची शिंगं धरली. बैलानेही त्या व्यक्तीला प्रतिकार करायचा प्रयत्न केला. पण या व्यक्तीचा जोश इतका होता की बैलाची शिंग धरून त्याने त्याला जमिनीवर आपटलं. त्यानंतर तो तिथून निघून गेला. हे वाचा - Video - छोटासा साप समजून शेपटी खेचली आणि समोर आला...; पाहून तरुणाला फुटला घाम राजेश कुमार वर्मा या फेसबुक युझरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने ही व्यक्ती दारू प्यायली आहे, असं पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bull attack, Pet animal, Shocking viral video

    पुढील बातम्या