छत्रपती संभाजीनगर, 26 जुलै, अविनाश कानडजे : साप आणि मुंगुस हे दोघेही एकमेकांचे वैरी आहेत. हे आपल्याला ठावूक आहे. त्यामुळे ते दोघेही कधीच एकमेकांना समोर पाहून घेत नाहीत. मुंगुसावर सापाच्या विषाचा फारसा परिणाम होत नाही ज्यामुळे तो एकमेव असा प्राणी आहे जो सापाला घाबरत नाही आणि थेट त्याच्यावर हल्ला करतो. साप आणि मुंगसाचे भांडण हे फारच थरारक असते. परंतु ते फार कमी वेळा पाहायला मिळते. त्यामुळे जेव्हा ही असं दृश्य दिसतं तेव्हा लोक त्याला आवर्जून पाहतात. सोशल मीडियावर देखील यासंबंधीत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कान नाही तरी ही सापाला कसं ऐकू येतं? कधी विचार केलाय का? सध्या दोघांच्या भांडणाचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून नक्कीच तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. हा व्हिडीओ छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील आमसरी-शिवना रस्त्यावरील आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की गावाच्या रस्त्याच्या कडेला कसे साप आणि मुंगुस भांडण करत आहेत.
रस्त्यावर मुंगुस आणि सापाचा चित्तथरारक व्हिडीओ#viral #viralvideo #trending pic.twitter.com/vf7MYTH2a7
— News18Lokmat (@News18lokmat) July 26, 2023
सुरुवातीला मुंगुस संपूर्ण शक्तीने सापावर हल्ला करतो. साप तिथून जाऊ पाहातो पण मुंगुस सापाला पुन्हा आत ओढतो. या नंतर काही काळ भांडण होतात ज्यानंतर पुन्हा साप रस्त्यावर येतो. यावेळी मात्र मुंगुस सापाजवळ येतो, पण पुन्हा आत झाडात जाऊन बसतं. त्यानंतर साप मुंगसाची वाट पाहत असतं पण ते काही बाहेर येत नाही. कदाचित तिथे जमलेल्या गर्दीला पाहून मुंगुस घाबरला असावा. ज्यामुळे त्याने सापावर हल्ला केला नाही. ही संपूर्ण घटना तिथे उभ्या असलेल्या नागरिकांनी आपल्या कॅमेरात कैद केली.