मुंबई, 28 मार्च : मोबाईल ब्लास्ट किंवा मोबाईल स्फोट, मोबाईल पेटला, मोबाईलला आग, अशी एक ना दोन किती तरी घटना तुम्हाला माहिती असतील. पण सध्या सोशल मीडियावर मोबाईलचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो खूप शॉकिंग आहे. मोबाईलवर टाइपिंग करता करता मोबाईलमधून अचानक धूर निघू लागला. एका व्यक्तीने मोबाईलवर असं काही टाइप केलं की त्यामुळे त्यातून धूर निघाला. मोबाईलमध्ये काहीतरी टायपिंग करताना त्यातून धूर, हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. नेमकं काय घडलं, हे कसं झालं, असे किती तरी प्रश्न तुम्हाला पडले असतील. आता या प्रश्नांची उत्तरं हवीत तर तुम्हाला आधी हा व्हिडीओ पाहावा लागेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मोबाईलच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हरवलेले, चोरीला गेलेले 6 लाख रु. किमतीचे मोबाईल पोलिसांकडे; पाहून फोनचे मालकही चक्रावले व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती आपल्या दोन्ही हातांनी मोबाईलवर काहीतरी टाइप करते आहे. मोबाईलवर ती नेमकं काय टाइप करते आहे ते दिसत नाही. मोबाईलची स्क्रिन ब्लॅक दिसते आहे. पण व्यक्ती टाइप करत असताना मोबाईलमधून धूर येतो आहे? आता असं तुमच्यासोबत घडलं असतं तर तुम्ही भीतीने तो मोबाईल तुमच्यापासून दूर फेकला असता. पण ही व्यक्ती तसं काहीच करत नाही. मोबाईलमधून धूर येत असतानाही मोबाईल तिच्या हातातच आहे, ती टाइपिंग करत राहते.
आता टायपिंग करताना मोबाईलमधून धूर का निघतो आहे? हा सर्वात मोठा प्रश्न. तुम्हालाही पडला ना? हा विचित्र व्हिडीओ पाहिल्यावर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. युझर्सनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता काय म्हणावं हिला! म्हणे, ‘नवरा नको, स्मार्टफोन हवा’; मोबाईलवेड्या पत्नीने शेवटी पतीला…. काही जणांनी फोन गरम झाला असावा असं म्हटलं आहे. तर एकाने फोन गरम नाही तर मोबाईलच्या खाली सिगारेट आहे, त्याचा हा धूर आहे, असं म्हटलं आहे.
आता तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटतं?, मोबाईलमधून धूर येण्याचं नेमकं कारण काय असू शकतं? ते तुम्ही आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.