Home /News /entertainment /

VIDEO: गाणं गाणाऱ्या शाहरुखला अबरामनं असं केलं गप्प! तरीही म्हणतोय 'सब सही होगा'

VIDEO: गाणं गाणाऱ्या शाहरुखला अबरामनं असं केलं गप्प! तरीही म्हणतोय 'सब सही होगा'

लॉकडाऊनचा तुम्हाला कंटाळा आला असला, कोरोनामुळे कितीही वैताग आला असला तरी- 'सब सही होगा'. हे आम्ही नाही तर किंग खान शाहरुख सांगत आहे.

    मुंबई, 04 मे : लॉकडॉऊनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. लॉकडाऊनचा तुम्हाला कंटाळा आला असला, कोरोनामुळे कितीही वैताग आला असला तरी- 'सब सही होगा'. हे आम्ही नाही तर किंग खान शाहरुख सांगत आहे. शाहरुखने त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. बॉलिवूडच्या 'I For India' या सर्वात मोठा निधी उपलब्ध करणाऱ्या कॉन्सर्टसाठी (biggest Fundraiser Concert I For India) त्याने हे गाणं गायलं आहे. सोशल मीडियावर झालेल्या या मैफिलीचा उपक्रम झोया अख्तर आणि करण जोहर यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus Pandemic) मुळे प्रभावित झालेल्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमीर खान, प्रियंका चोप्रा, विल स्मिथ, अक्षय कुमार, शबाना आझमी, रणवीर सिंह, Mick Jagger यांंनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान अन्य बॉलिवूड कलाकारांनी देखील या उपक्रमाला त्यांचा पाठिंबा दाखवला होता.
    संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या