प्रयागराज 15 सप्टेंबर : सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हारयर झाला होता. ज्यामध्ये एक लहान मुलगा आणि त्याच्या शिक्षिकेमध्ये खूपच क्यूट भांडण सुरु होतं. या व्हिडीओला सोशल मीडियावर लोकांनी खूपच पसंती दर्शवली आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ अगदी काही अगदी देशभरात ट्रेंड होऊ लागला. हा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला, तेव्हा हा व्हिडीओ कुठला आहे आणि त्यामध्ये नक्की काय घडलं होतं हे माहित नव्हतं, ज्यामुळे ते जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये फारच उत्सूक्ता होती. आता या व्हिडीओमागची सगळी कहाणी समोर आली आहे. वास्तविक हा व्हिडीओ प्रयागराजच्या नैनी येथील सेठ आनंद राम जयपुरिया शाळेचा आहे, व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या शिक्षिका विशाखा त्रिपाठी आहेत. या व्हिडीओसंदर्भात शिक्षिका विशाखा त्रिपाठी यांनी न्यूज18 लोकलच्या टीमशी बोलताना सांगितले की, हा व्हिडीओ सुमारे एक आठवडा जुना आहे. हे वाचा : भरधाव वेगाने आलेल्या बाईक चालकाने विद्यर्थिनीला फुटबॉल सारखंच उडवलं, VIDEO VIRAL विशाखा त्रिपाठी या LKG च्या वर्गशिक्षिका आहेत. त्यांनी सांगितले की, या लहान मुलाचं नाव अथर्व सेन आहे. जो फ्रुट ऍक्टिविटी दरम्यान खूपच मस्ती करत होता. तो शांत राहात नसल्यामुळे मग त्या अथर्व वरती रागावल्या. ज्यानंतर अथर्व त्यांची समजूक काढून, मी पुन्हा असं करणार नाही असं वारंवार म्हणतो. अखेर अथर्व त्यांनी किस वैगरे करुन आपल्याशी बोलण्यासाठी भाग पाडतो. अथर्वचे हे गोंडस कृत्य पाहून उपस्थित शिक्षकाने हा व्हिडीओ बनवला, जो नंतर वर्गशिक्षिका विशाखा त्रिपाठी यांना दाखवला. नंतर त्यांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला. परंतू त्यांना असं वाटलं नाही की, या व्हिडीओला इतका प्रतिसाद मिळेल. शेवटी शिक्षिकेनं सांगितलं की, प्रत्येक शिक्षकांनी मुलांशी प्रेमाने वागायला हवं. कारण मुलं ही खोडसाळ असतात, परंतू त्यांना प्रेमानं समजावलं तर ते लगेचच मोठ्यांचं ऐकतात.
शिक्षिका आणि लहान मुलाच्या क्यूट भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होताचं, शिक्षिकेनं सांगितली त्यामागची कहाणी#ViralVideo #trendingvideo pic.twitter.com/MNZXFpUPel
— News18Lokmat (@News18lokmat) September 15, 2022
हे वाचा : ‘‘आमच्या वेळेला कुठे होते असे शिक्षक?’’ हा क्यूट VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल हा व्हिडीओ नक्की आहे तरी काय? या व्हिडीओमध्ये शिक्षिका त्या लहान मुलावर रागवली आहे आणि त्याच्यासोबत आता ती बोलणार नाही असं देखील सांगत आहे. त्याचवेळी हा मुलगा मी अशी चूक करणार नाही असं या शिक्षिकेला सांगतो आणि तिच्या गालावर प्रेमाने किस देखील करतो. हा मुलगा आपल्या क्यूटनेसने आपल्या शिक्षिकेला पूर्णपणे मनवण्याचा प्रयत्न करतो. परंतू ती त्याच्यावर रागावून बसलेली आहे. या व्हिडीओने अनेकांची मन जिंकली आहेत.

)







