मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरे आवर! खोडकर दिराला वहिनीने एका चापटीत आणलं ताळ्यावर; VIDEO VIRAL

अरे आवर! खोडकर दिराला वहिनीने एका चापटीत आणलं ताळ्यावर; VIDEO VIRAL

अन् वहिनीने दिराला लगावली चापटी.

अन् वहिनीने दिराला लगावली चापटी.

वहिनी आणि दिराचा हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

मुंबई, 24 ऑगस्ट :  दिर आणि वहिनीचं (Devar Bhabhi) नातं शब्दात मांडण्यासारखं बिलकुल नाही. कधी ते मायलेक असता, कधी बहीण-भाऊ तर कधी मित्र-मैत्रिणी. त्यांच्या एका नात्यात अशी बरीच नाती दिसून येतात. वहिनी (Sister in law) दिरात (Brother in law) एकाच वेळी अशी सर्व नाती दिसणारा एक मजेशीर (Funny video) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल  (Viral video) होतो आहे.

दिर वहिनीपेक्षा (Vahini dir) वयाने लहान असला तर तो जसं आई, बहीण किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जसा खोडकरपणा करतो तसाच तो या वहिनीसमोर करतो. अशाच एका खोडकर दिलाला त्याच्या वहिनीने चांगलंच वठणीवर आणलं आहे. एका चापटीतच तिने आपल्या दिराला ताळ्यावर आणलं आहे.

व्हिडीओत पाहू शकता वहिनी बेडवर बसली आहे आणि खाली जमिनीवर तिच्या पायाशेजारी तिचा दिर बसला आहे. वहिनी काहीतरी वाचते आहे आणि दिर कानात ईअरफोन घालून गाणी ऐकतो आहे. व्हिडीओत बाजीराव मस्तानी फिल्ममधील पिंगा गं पोरी पिंगा हे गाणं ऐकू येतं, म्हणजे दिर ईअरफोनमधून ते गाणं ऐकतो आहे. पण त्याचवेळी तो गाणं गातानाही दिसतो आहे, जे त्याच्या वहिनीला ऐकू येतो.

हे वाचा - ऐन लग्नात भडकली नवरी, नवरदेवाजवळ जायलाच तयार नाही; काय झालं ते VIDEO मध्ये पाहा

वहिनी त्याचं गाणं ऐकून हैराणच होते. ती त्याच्या कानातील ईअरफोन काढते, त्यावेळी तो टिंडोरी पकोडा असं आपल्या बेसूर आवाजात गाताना दिसतो. त्याची वहिनी त्याला हाताने इशारा करत काय चाललं आहे विचारते. पण तो काही ऐकेना मग त्याच्या डोक्यावर चापटी मारते. तेव्हा कुठे तो ताळ्यावर येतो.

वहिनी म्हणून आपल्या दिराचा खोडकरपणा पाहून ती त्याच्यावर हसते. बहिणीसारखं हक्काने त्याच्या कानातील ईअरफोन काढते. पण त्याचवेळी आईसारखा मार देऊन त्याला वठणीवरपण आणते आणि शेवटी दोघंही मित्र-मैत्रिणींसारखे एकमेकांसोबत हसतानाही दिसतात.

हे वाचा - नवरदेवाला पाहताच सुटला नवरीचा ताबा! लग्नमंडप सोडून रस्त्यावर आली...; VIDEO पाहा

मानसी ठाकूर या इन्टाग्राम य़ुझरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  वहिनी आणि दिराचा हा मजेशीर व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:
top videos

    Tags: Funny video, Viral, Viral videos