मराठी बातम्या /बातम्या /Viral /आरारारारा... खतरनाक! डोक्यावर पदर घेऊन जबरदस्त ठुमके; वहिनीचा दिरासोबत भन्नाट डान्स VIRAL

आरारारारा... खतरनाक! डोक्यावर पदर घेऊन जबरदस्त ठुमके; वहिनीचा दिरासोबत भन्नाट डान्स VIRAL

वहिनी-दिराची धम्माल जोडी.

वहिनी-दिराची धम्माल जोडी.

वहिनी-दिराने डान्स फ्लोरवर आग लावली आहे.

मुंबई, 25 ऑगस्ट : काही दिवसांपूर्वीच एका वहिनी-दिराच्या (Devar Bhabhi) जोडीचा डान्सचा व्हिडीओ (Devar Bhabhi Dance Video) व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ अनेकांना आवडला. आता याच वहिनी-दिराच्या जोडीचा आणखी एक डान्स व्हिडीओ (Dance video) समोर आला आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या गाण्यांवर दोघंही थिरकताना दिसत आहे.

वहिनी-दिराचं नातं हे मायलेक, भाऊ-बहिणी किंवा एखाद्या मित्र-मैत्रिणीप्रमाणे असतं. अशाच मित्र-मैत्रिणींसारखी केमिस्ट्री पाहायला मिळते ते या वहिनी-दिरामध्ये. जे दोघंही सर्वांसमोर भन्नाट डान्स करतात. वहिनी न लाजता आपल्या लाडक्या दिरासोबत चांगलेच ठुमके लगावताना दिसते.

" isDesktop="true" id="596756" >

अंकित जंगिड (Ankit Jangid) या युट्यूब अकाऊंटवर (YouTube Video) हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अंकित हा आपल्या वहिनीसोबत डान्स करताना दिसतो आहे. या दोघांचे असे बरेच व्हिडीओ आहेत. जे अंकितने या एकाच व्हिडीओत दाखवले आहेत.

हे वाचा - अद्भुत! रंग बदलणारा Octopus पाहिलात का? कॅमेऱ्यात कैद झाला निसर्गाचा चमत्कार

कधी घरात तर कधी लग्नात तर कधी पार्टीत हे दोघंही थिरकताना दिसत आहेत. कधी ते हरयाणी तर कधी पंजाबी गाण्यावर ताल धरतात. वहिनी स्टेप्सच्या बाबतीत आपल्या दिरालाही टक्कर देताना दिसते. सर्व गाण्यांमध्ये ती साडीतच दिसते. डोक्यावर पदर घेऊन देशी अंदाजात ती नाचण्यात मात्र कोणतीही कसर सोडत नाही.

हे वाचा - नवरदेवाची पाठ फिरताच नवरीला...; लग्नात Ex-boyfriend ने काय केलं पाहा VIDEO

डान्समध्ये जितका उत्साह, जोश तिच्या दिराचा आहे, तितकाच तिचाही दिसून येतो. या वहिनी-दिराची जोडी सर्वांच्याच पसंतीस पडत आहे.

First published:
top videos

    Tags: Dance video, Viral, Viral videos