मुंबई 05 ओक्टोबर : आपण हे बऱ्याचदा ऐकलं असेल की अनेकदा विवाहित स्त्री किंवा पुरुष हे आपल्या जोडीदाराची फसवणूक करतात आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असतात. खरं तर सध्या, विवाहबाह्य संबंध ही एक अतिशय किरकोळ गोष्ट बनली आहे, परंतू असं असलं तरी देखील हे कधीही नैतिक नाही, तसेत त्याला समाजात मान्यता देखील नाही. ज्यामुळे अशा प्रकरणानंतर अनेकांना गंभीर समस्यांना देखील सामोरं जावं लागलं आहे. तसे पाहाता कितीही झालं तरी अशा गोष्टी लपून राहात नाहीत. त्या या ना त्या मार्गानं समोर येतातच. मग अखेर कौटुंबीक भांडणं, कामावर परिणाम आणि कोट कचेरी या सगळ्या गोष्टी तेथे येतात. खरंतर असाच एक प्रकार अमेरिकेतील महिला कॅब ड्रायव्हर सोबत घडला, ज्यानंतर या महिलेनं जे केलं त्याचा तुम्ही विचार देखील करु शकत नाही. काय आहे संपूर्ण घटना? या महिला ड्रायव्हर रॉनीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेबद्दल सांगत आहे, जी 80 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. मात्र, यानंतर खुद्द रॉनीही वादाचा बळी ठरली. या व्हिडिओमध्ये रॉनी म्हणतेय “मी नेहमीप्रमाणे माझे काम करत होते आणि मी माझा पिक अप घेतला. त्यावेळी या व्यक्तीला सोडायला त्याची बायको आणि मुलं आली होती. यानंतर ती व्यक्ती आली आणि गाडीत बसली, नंतर मी गाडी चालवू लागले. रॉनी पुढे म्हणाली, ‘‘दुसऱ्याच क्षणी त्या व्यक्तीने त्याच्या गंतव्यस्थानापूर्वी दुसऱ्या ठिकाणी गाडी थांबण्यास सांगितले, तिथून एक महिलाही आली आणि कारमध्ये बसली, तिच्याकडे काही सामानही होते.’’ ती महिला गाडीत बसताच, या व्यक्तीचा मूड बदलला. बायकोपासून सुटका करून घेतल्यासारखी ती व्यक्ती आनंदी दिसत होती. महिलेचे चुंबन घेतल्यानंतर त्या व्यक्तीने कॅबचे ड्रॉप ऑफ लोकेशन बदलले. असं रॉनीने सांगितलं. रॉनीने सांगितले की, त्या व्यक्ती सोबतची महिला तिला सारखी विचार होती की, ‘‘मला या सगळ्याचा कंटाळा आलाय तू तुझ्या बायकोला कधी सोडशील?’’ हे वाचा : बिअर पिऊन मुलांना शिकवत होता शिक्षक, Viral Video पाहून लोकांकडून संताप व्यक्त रॉनीने या दोघाना शिकवला धडा रॉनीने सांगितले की, जिथून तिने ही राइड सुरू केली तेथून ती फक्त आठ किलोमीटर दूर होती. त्यामुळे तिने गाडी मागे वळवली आणि महिलेसोबत असलेल्या पुरुषाला त्याच्या घराबाहेर सोडले. रॉनी म्हणाली ‘हे अतिशय लज्जास्पद आणि घृणास्पद कृत्य होतं, ते दोघेही माझ्या कारमध्ये घाण पसरवत होते. त्यांच्या कर्माचे फळ त्यांना भोगावेच लागेल. आपण चांगले मानव बनले पाहिजे, आपण जीवनात चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत.” हे वाचा : VIDEO - ताबा सुटलेल्या शिक्षिकांचं शाळेतच संतापजनक कृत्य; समोर विद्यार्थी आहेत याचंही भान त्यांना राहिलं नाही रॉनीने त्या दोघांनाही त्यांच्या सामानासह त्या व्यक्तीच्या घराबाहेर उतरवलं आणि सांगितलं की, मी कोणत्याही कंपनी सोबत काम करत नाही, मी स्वतंत्र कॅब चालवते आणि मला तुमचं वागणं अजिबात आवडलं नाही, ज्यामुळे मी तुमची राईड कॅसल करु शकते. असं देखील त्या दोघांना सांगितलं. रॉनेने ही घडलेली घटना सोशल मीडियावर सांगितली, ज्यानंतर लोकांनी तिचं भरपूर कौतुक केलं, तर अनेकांनी रॉनीला तिच्या अशा वागण्यामुळे ट्रोल देखील केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.