मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पाकिस्तानात अजब लग्न, तरुणानं हिंदू पद्धतीनं बकरीसोबत घेतले 7 फेरे, पाहा Viral Video

पाकिस्तानात अजब लग्न, तरुणानं हिंदू पद्धतीनं बकरीसोबत घेतले 7 फेरे, पाहा Viral Video

पाकिस्तानमधील सिंध प्रांतात एका तरुणानं बकरीसोबत हिंदू पद्धतीनं लग्न केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

  • Published by:  desk news

लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक ठराविक चित्र उभं राहतं. सजलेला वर आणि वधू, हौशी वऱ्हाडी मंडळी, सजावट, खाणंपिणं, मानपान, खरेदी, नाचगाणी आणि बरंच काही... पण जगात केवळ याच पद्धतीनं लग्नं होतात असं नव्हे. पाकिस्तानमधील असंच एक लग्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतंय.

पाकिस्तानमधील सिंध प्रांतात एका तरुणानं बकरीसोबत हिंदू पद्धतीनं लग्न केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या लग्नाला अनेक नातेवाईकदेखील हजर होते. इतर लग्नांसारखंच हे लग्नदेखील पार पडलं. मात्र त्यात वेगळेपण होतं केवळ वधूमध्ये. या लग्नात वधू म्हणून एका बकरीला आणण्यात आलं होतं.

एक तरुण या बकरीसोबत अग्निभोवती फेरे घेत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून असा अघोरी प्रकार करणाऱ्या तरुणाचा ते शोध घेत आहेत. या लग्नात सहभागी झालेल्या नातेवाईकांचादेखील पोलिस शोध घेत असून लवकरच त्यांना धडा शिकवणार असल्याचं सिंध पोलिसांनी सांगितलं आहे. या लग्नाचा व्हिडिओ मात्र सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियात प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुणीही काहीही करत असल्याचं दिसतं. मात्र यामुळे गैरप्रकारांनाही चालना मिळत असल्याचं दिसतं. अशा घटनांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Marriage, Pakisatan, Viral video.