• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • OMG! 10 बाळांना जन्म देणारी महिला कधी प्रेग्नंटच नव्हती, या नाटकामागचं कारण ऐकून बसेल धक्का

OMG! 10 बाळांना जन्म देणारी महिला कधी प्रेग्नंटच नव्हती, या नाटकामागचं कारण ऐकून बसेल धक्का

जगभर प्रसिद्ध होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) गोसीएम थमारा या महिलेने एक बनाव केला होता. तिने आपल्या पोटात उशी ठेवून फोटा काढला आणि तो 7 जूनला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. त्याचबरोबर तिने जाहीर केलं की माझ्या पोटात 10 बाळं आहेत.

  • Share this:
प्रसिद्धी (Publicity) मिळावी, लोकांनी आपल्याबद्दल चर्चा करावी असं अनेकांना वाटतं. त्यासाठी तो काहीही करू शकतो. आता सोशल मीडियामुळे (Social Media) चट्कन जगभर प्रसिद्ध होण्याची संधी उपलब्ध होते. तुम्हाला अजिबात न ओळखणाऱ्या व्यक्तीही तुम्हाला प्रसिद्ध करण्यात हातभार लावतात. असंच जगभर प्रसिद्ध होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) गोसीएम थमारा या महिलेने एक बनाव केला होता. तिने आपल्या पोटात उशी ठेवून फोटा काढला आणि तो 7 जूनला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. त्याचबरोबर तिने जाहीर केलं की माझ्या पोटात 10 बाळं आहेत. त्याचबरोबर तिने हे देखील जाहीर केलं होतं की सर्व 10 बाळं नैसर्गिक पद्धतीने डिलिव्हरी होऊन जन्माला आली आहेत. त्यानंतर ती अचानक गायब झाली. व्हायरल झाली बातमी आताच्या सोशल मीडियाच्या जगात ही बातमी व्हायरल व्हायला किती असा वेळ लागणार? तसंच झालं जगभरात ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. सगळीकडून आश्चर्य व्यक्त होत होतं. काही सेवाभावी संस्थांनी तिच्यासाठी फंड (Fund) गोळा करायलाही सुरुवात केली होती. आफ्रिकी पोलीस (African Police) आणि अधिकाऱ्यांनी देशातल्या सर्व रुग्णालयांमध्ये 10 बाळांना जन्म देणाऱ्या आईचा शोध सुरू केला पण त्यांना ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर त्या महिलेचा नवरा आधीपासूनच विवाहित होता आणि महिला मानसिकदृष्ट्या आजारी होती अशी ट्वीट्स समोर आली. हे वाचा-आईशप्पथ! ड्रायव्हरची चक्क बसच्या टपावर जाऊन धुलाई, बघा Live Video बाळंत झाल्यानंतरचे थमाराचे फोटोही (Photos after delivery) कुठे उपलब्ध झाले नाहीत तेव्हा पोलिसांसह सगळ्यांचाच संशय बळावला. त्यानंतर हे स्पष्ट झालं की थमाराने केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा स्टंट केला होता. थमाराच्या पोटात 10 बाळं नव्हतीच. तिने तसा बनाव केला होता. 10 बाळांना जन्म देण्याचा तिने बनाव केल्याचं स्पष्ट झालं होतं. या आधीही केला होता असा स्टंट पोलिसांनी जेव्हा कसून तपास केला तेव्हा त्यांना लक्षात आलं की थमाराची खोटंखोटं गरोदर राहण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. या आधीही तिने आपण गरोदर असून आपल्या पोटात तीन बाळं असल्याची बातमी सोशल मीडियावर टाकली होती. ती बातमीही खोटी होती. यावेळी ती जरा मोठं खोटं बोलली त्यामुळे पकडली गेली. हे वाचा-छतावरून सरकत सरकत तो आला, पक्कड घेतली, आणि समोर पाहतो तर काय...!पाहा Viral Video कुठे आहे थमारा आता थमारा कुठे आहे हा प्रश्न होताच. थमारा ही मानसिकदृष्ट्या आजारी आहे हे पोलिसांना लक्षात आलं तेव्हा तिला वेड्यांच्या इस्पितळात (Mental Hospital) दाखल करण्यात आलं. तिच्यावर सध्या उपचार केले जात आहेत. ती मानसिक रुग्ण असल्याने तिने हे स्टंट केले होते. तिचा नवरा टेबाशो टसोटेटसी याचं म्हणणं आहे की थमाराच्या परवानगीशिवाय तिला वेड्यांच्या रुग्णालयात ठेवलं आहे. त्यामुळे तो तिला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती आफ्रिकी सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
First published: