अहमदाबाद, 14 जुलै: अहमदाबादमधील (Ahmedabad) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral) व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका व्यक्तीनं बस ड्रायव्हरची (Bus driver ) बसच्या टपावर जाऊन धुलाई केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे. त्याच झालं असं की, अहमदाबादमध्ये बीआरटीएस बसच्या धडकेत एका बाईकस्वाराचा मृत्यू झाला. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी बस ड्रायव्हरला घेरलं.
अहमदाबादमधील बस ड्रायव्हरला झालेल्या मारहाणीचा Live Video pic.twitter.com/tiN38edl0U
— News18Lokmat (@News18lokmat) July 14, 2021
त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बस ड्रायव्हर बसच्या टपावर चढला. दरम्यान संप्तत नागरिकांपैकी एक जण बसच्या टपावर चढला आणि त्यानं बस ड्रायव्हरला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. हेही वाचा- भारतीय सैन्याला मोठं यश, लष्कर ए-तौयबाचा कमांडरसह तीन दहशतवादी ठार आपण व्हिडिओत बघू शकतो की, बस ड्रायव्हर कसा बसच्या टपावर जाऊन बसला आहे. दरम्यान मध्येच एक व्यक्तीही टपावर चढतो आणि त्याला मारहाण करतो. त्यातच बस ड्रायव्हर कोणाला तरी फोन लावतानाही दिसतोय.