मराठी बातम्या /बातम्या /Viral /

छतावरून सरकत सरकत तो आला, पक्कड घेतली, आणि समोर पाहतो तर काय...! पाहा Viral Video कधी करू नका ही चूक

छतावरून सरकत सरकत तो आला, पक्कड घेतली, आणि समोर पाहतो तर काय...! पाहा Viral Video कधी करू नका ही चूक

छतावर चढून वीजेची चोरी करणाऱ्या इसमाला कॅमेऱ्यात रंगेहाथ पकडल्यामुळे त्याची चोरी तर उघडकीला आलीच, मात्र चेहरादेखील बघण्यासारखा झाला.

छतावर चढून वीजेची चोरी करणाऱ्या इसमाला कॅमेऱ्यात रंगेहाथ पकडल्यामुळे त्याची चोरी तर उघडकीला आलीच, मात्र चेहरादेखील बघण्यासारखा झाला.

छतावर चढून वीजेची चोरी करणाऱ्या इसमाला कॅमेऱ्यात रंगेहाथ पकडल्यामुळे त्याची चोरी तर उघडकीला आलीच, मात्र चेहरादेखील बघण्यासारखा झाला.

  • Published by:  desk news

लखनऊ, 13 जुलै : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये (Gaziabad) छतावर चढून वीजेची चोरी (Electricity theft) करणाऱ्याला कॅमेऱ्यात रंगेहाथ पकडल्यामुळे त्याची चोरी तर उघडकीला आलीच, मात्र चेहरादेखील बघण्यासारखा झाला. वीज  मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कल्पना लढवून ही चोरी उघडकीला आणली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगरमध्ये वीज चोरी होत असल्याची तक्रार एका नागरिकानं केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी वीज मंडळाचे कर्मचारी त्या भागात पोहोचले. ज्या घरातून वीज चोरी होत असावी, असा संशय होता, त्या घऱातून माहिती घेण्याचा आणि पाहणी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र बेल वाजवून आणि हाका मारूनही त्या घराचं दार उघडलं न गेल्यामुळं वीज कर्मचाऱ्यांचा संशय बळावला.

" isDesktop="true" id="578967" >

अशी लढवली कल्पना

वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एक अनोखी कल्पना लढवली आणि त्यांच्यापैकी एक सदस्य हा शेजारच्या घराच्या छतावर गेला आणि इतर सर्वजण त्याच्या घरापाशी उभे राहिले. या प्रकारामुळे भांबावलेली ती व्यक्ती आपली वीजचोरी पकडली जाईल, म्हणून चोरलेल्या वीजेचं कनेक्शन तोडण्यासाठी छतावर आली. छतावर पालथं पडून सरकत सरकत ही व्यक्ती वायरपर्यंत पोहोचली. आपल्या हातातील हातोडीनं ती वायर तोडण्याआधीच शेजारच्या छतावरून व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यानं त्याला आवाज दिला. आपली चोरी पकडली गेल्याचं लक्षात आल्यावर त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तो जसा आला, तसाच लगबगीनं छतावरून मागे गेला. मात्र तोपर्यंत त्याची चोरी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती. हा व्हिडिओ बघता बघता सगळीकडे पसरला आणि व्हायरल झाला.

हे वाचा -‘बसपन’ का प्यार कभी भूल नही जाना रे, चिमुरड्याच्या ‘लव्ह सॉंग’ला लाखो हिट्स

वीजचोरीच्या वाढत्या घटना

उत्तर प्रदेशात अशा प्रकारे वीज चोरीच्या अनेक घटना घडत असल्याचं दिसून आलं आहे. वारंवार तक्रारी करूनही हे प्रकार थांबत नसल्यामुळे आता वीज मंडळानं धाडसत्र सुरू केलं आहे. वीजचोरी करणाऱ्यांविरोधात व्हिडिओच्या किंवा इतर माध्यमातून पुरावे गोळा करून त्यांच्यावर कडक कारवाई आणि दंडात्मक वसुली करण्याची योजना वीज मंडळानं तयार केल्याची माहिती आहे. यामुळे आता तरी वीजेची चोरी थांबेल, अशी अपेक्षा आहे.

First published:

Tags: Electricity, Uttar pradesh