नवी दिल्ली, 31 मार्च : आपलं लग्न अविस्मरणीय व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. काही लोक आपलं लग्न खास बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी काहीतरी हटके, अनोखं करतात. कुणी ग्रँड एंट्री घेतं, कुणी डान्स करतं, कुणी हेलिकॉप्टरमधून वरात नेतं. असे एका ना दोन कितीतरी युनिक वेडिंग तुम्हाला माहिती असतील. पण लग्नातील अशी हौस काही वेळा भारीही पडू शकते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
लग्नाचे व्हिडीओ म्हटलं की मजेशीर असतात पण लग्नाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र तुमच्या काळजात धस्सं होईल. नवरा-नवरीची नको ती हौस त्यांच्या अंगाशी आली आहे. भरमंडपात नवरीसोबत भयंकर घडलं आहे. नवरा-नवरी अनोख्या पद्धतीने फोटो काढत होते, त्यासाठी त्या दोघांनी पोझही दिली. पण काही क्षणात असं काही घडलं ज्याचा विचार कुणीच केला नव्हता.
हे फनी बिलकुल नाही! भरमंडपात नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही की VIDEO पाहून नेटिझन्स संतप्त
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांकडे पाठ करून उभे आहेत. त्यांची पाठ एकमेकांना टेकली आहे. त्यांच्या हातात गन दिसते आहे, ही स्पार्कल गन आहे. स्पार्कल गन हातात घेत कपल पोझ देतं. त्यानंतर गनचं बटण दाबतात आणि त्यातून स्पार्कल बाहेर पडतं. पण पुढच्याच क्षणी जे घडतं ते धक्कादायक आहे.
नवरीच्या हातातील स्पार्क गनचा स्फोट होतो. स्पार्कल गन पेट घेते आणि ती आग नवरीच्या चेहऱ्यावर जाते. नवरी मोठमोठ्याने किंचाळते. बंदूक फेकत ती नवरदेवाच्या छातीवर डोकं ठेवते. हे दृश्य पाहिल्यानंतर लग्नमंडपात असलेले सर्वजण घाबरतात. नवरीच्या दिशेने धाव घेतात.
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @Sassy_Soul_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
उतावळी नवरी अन्...! लग्नाआधी नवरदेवाने पुरवली नाही 'ती' हौस; तिनं उचललं टोकाचं पाऊल
यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही जणांनी काही लग्नातील असेच भयंकर किस्सेह सांगितले आहेत. नवरीबाबत चिंता व्यक्त करत ती ठिक असावी अशी आशाही व्यक्त केली आहे.
Idk what's wrong with people these days they are treating wedding days more like parties and this is how they ruin their perfect day. ♀️ pic.twitter.com/5o626gUTxY
— Aditi. (@Sassy_Soul_) March 31, 2023
तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटलं? किंवा तुम्ही कधी कुणाच्या लग्नात अशी भयंकर घटना पाहिली आहे का? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Couple, Marriage, Viral, Viral videos, Wedding, Wedding video