मुंबई 11 डिसेंबर : सोशल मीडियावर विचित्र गोष्टी करणाऱ्या तरुणांना तुम्ही पाहिलेच असणार, काही लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी काही तरुण मंडळी अगदी काहीही करण्याची तयारी दाखवतात. असच काहीस एका तरुणाने केलं आहे. त्याने रिल्स बनवण्याच्या नादात स्वत:चं असं काही नुकसान करुन घेतलं आहे की आता तो कोणाला तोंड देखील दाखवू शकत नाही. या तरुणाने दारुला आग लावली आणि ती दारु पिण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हाच ती दारु त्याच्या अंगावर पडली आणि त्या दारुने त्याच्या कपड्यांवरच पेट घेतला आहे. हे ही पाहा : रस्त्यावर भांडत होते तरुण, भरधाव वेगात आली कार आणि… Video अंगावर काटा आणणारा हे दृश्य तसे पाहाता खूपच गंभीर आहे. या तरुणाची या आगीमुळे काय अवस्था झाली असावी, हे आपण पाहू शकतो. परंतू त्याचा हा प्रकार मनोरंजक देखील आहे. कारण लोक कधीकधी असा मूर्खपणा करतात की त्याचं दु:ख वाटण्यापेक्षा आपल्याला त्यावर हसूच जास्त येतं. लोकांनी या व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स देखील केलं आहेत. तर या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीची कॉमेंट्री देखील ऐकू येत आहे. नक्की काय घडलं? या व्हिडीओच्या सुरुवातीला एक तरुण ग्लासामध्ये दारु घेऊन बसला आहे. त्याने या दारुला आग लावली आहे. जी तुम्हाला या ग्लासाच्या वर दिसेल. त्यानंतर हा तरुण ही पेटती रु पिण्याचं धाडस दाखवणार असतो. त्यासाठीच खरंतर तो हा व्हिडीओ शुट करत असतो. पण ही पेटती दारु पिण्यापूर्वी तरुणाला थोडी भीती वाटते आणि तो थांबतो. पण तेव्हाच ही दारु आगीसकट त्या मुलावर पडते.
Nahh his d### gone🤣#gorey #gore #goreblood #gore #gorevid #dark #fire #viralterbaru #ViralVideos #viral #Trending #trendingvideo #trends #Gone #gonewrong pic.twitter.com/oQ9rnY9jyP
— Officialgore🔞 (@officiaIkt7) December 5, 2022
ही दारु त्याचे कपडे शोषून घेते आणि त्यावर ही आग तशीच पेटती राहाते. हे पाहून तरुण घाबरला आणी आग विझवू लागला. पण आग काही विझली नाही. अखेर त्याचा मित्र मदतीला आला, पण तो देखील ती आग विझवू शकला नाही. तरुणाच्या गुप्तांगाजवळ ही आग लागली होती. त्यामुळे त्याना गंभीर दुखापत झाली असणार हे नक्की. या व्हिडीओवर लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. तुम्हाला देखील हा व्हिडीओ पाहून हसू आल्याशिवाय राहाणार नाही.