Home /News /viral /

स्टंटसाठी तरुणाने सायकलसह हवेत घेतली कोलांटी उडी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

स्टंटसाठी तरुणाने सायकलसह हवेत घेतली कोलांटी उडी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

व्हायरल होत असलेली ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने शेअर होत आहे. जी ड्रोनच्या माध्यमातून चित्रित करण्यात आली होती. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती सायकलवर बसून स्टंट करताना (Cycle Stunt) दिसतो

  नवी दिल्ली 08 एप्रिल : आजकाल सोशल मीडियावर अनेक थरारक व्हिडिओ पाहायला मिळतात, जे नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरतात. सध्या स्टंटच्या तडक्यासोबतच अॅडव्हेंचर गेमचे व्हिडिओ (Adventure Games Videos) नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहेत. त्यामुळे अॅडव्हेंचर स्पोर्टचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. नुकताच असाच एक रोमांचक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून युजर्सही चक्रावले आहेत. पिल्लाला वाचवण्यासाठी मगरीच्या जबड्यात गेली आई; मन हेलावणारा VIDEO आजकाल सामान्य लोक रस्त्यांवर सायकल चालवताना दिसतात, तर स्पोर्ट पर्सन सायकलवर रेसिंग करताना दिसतात. या सर्वांव्यतिरिक्त असे काही लोक आहेत जे हे सहज वाटणारं काम मोठ्या स्तरावर करतात. म्हणजेच ते काहीतरी वेगळं करून दाखवतात. त्यांचे व्हिडिओ पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल. नुकतंच समोर आलेल्या व्हिडिओमध्येही असंच काहीसं पाहायला मिळतं. यात एक माणूस माउंटन बाईकसह स्टंट करताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by wibmer (@wibmerfpv)

  व्हायरल होत असलेली ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने शेअर होत आहे. जी ड्रोनच्या माध्यमातून चित्रित करण्यात आली होती. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती सायकलवर बसून स्टंट करताना (Cycle Stunt) दिसतो. यात दिसतं की हा व्यक्ती चढउतार असलेल्या रस्त्यांवर सायकल चालवत हवेत आपली स्टंटबाजी दाखवत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. अजगराला पकडण्यासाठी तरुणाने पाण्यात घेतली उडी; पुढे काय घडलं बघा, थरकाप उडवणारा VIDEO सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. व्हिडिओमध्ये स्टंट करणाऱ्या व्यक्तीचा बॅलन्स खूपच अप्रतिम आहे. त्यामुळे तो आपल्या प्रयत्नात यशस्वी होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत तरुणाचं कौतुक केलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Stunt video

  पुढील बातम्या